नवी दिल्ली। आयपीएलचा 13 वा हंगाम यूएई येथे खेळला जात आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेल्या या हंगामाच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 26 कोटी 90 लाख लोकांनी सामने पाहिले. मागील वर्षाच्या तुलनेत सामना पाहणाऱ्यांच्या संख्येत प्रत्येक सामन्यात 1.1 कोटीने वाढ झाली आहे.
आयपीएल 2020 च्या पहिल्या आठवड्यात 2019 च्या हंगामाच्या तुलनेत सामना पाहणाऱ्या दर्शकांच्या संख्येत प्रति सामन्यात सरासरी 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या 7 सामन्यांना जगभरातील 21 चॅनेलवर सुमारे 60.6 अरब मिनिटे पाहण्यात आले आहे.
टीव्ही व्ह्युअरशीप मॉनिटरिंग संस्था बार्क निल्सेनने ‘आयपीएल-20 चे टेलिव्हिजन दर्शकत्व आणि जाहिरातींचा वापर’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की चालू हंगामाच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक मिनिटाची दर्शकसंख्या मागील वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी २२ सप्टेंबर रोजी ट्विटरवर याबद्दल सांगितले होते. त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना त्यांच्या ट्विटमध्ये टॅग केले होते.
Opening match of #Dream11IPL sets a new record!
As per BARC, an unprecedented 20crore people tuned in to watch the match. Highest ever opening day viewership for any sporting league in any country- no league has ever opened as big as this. @IPL @SGanguly99 @UShanx @DisneyPlusHS
— Jay Shah (@JayShah) September 22, 2020
त्यात त्यांनी सांगितले की, “इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात खेळलेला पहिला सामना सुमारे 20 कोटी लोकांनी पाहिला. कोणत्याही खेळाचा उद्घाटन सामना पाहणारी ही सर्वाधिक लोकसंख्या आहे.”