आयपीएल हे एक असे माध्यम आहे जिथे बऱ्याच नवीन खेळाडूंना संधी मिळते आणि येथे खेळल्यानंतर काही आपल्या देशासाठीही खेळले आहेत. भारतीय युवा खेळाडूंसाठी आयपीएल ही महत्त्वाची स्पर्धा मानली जाऊ शकते. यावेळी कोरोना विषाणूमुळे आयपीएल२०२०ला पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल २०२०ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सर्व संघांना प्रशिक्षण सत्र घ्यावे लागेल. त्यानंतर स्पर्धा सुरू होईल.
कोरोना विषाणूमुळे खेळाडू देखील त्यांच्या घरीच आहेत, त्यामुळे तेसुद्धा खेळ कधी सुरू होईल याची वाट पहात आहेत. देशी-परदेशी खेळाडूंनी सुशोभित झालेल्या या लीगमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्साहाने भरलेला आहे. प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.
आयपीएलमध्ये प्रत्येकवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूला ऑरेंज कॅप दिली जाते. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटपटूला पर्पल कॅप दिली जाते. या लेखात त्या ३ खेळाडूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे जे आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकू शकतात.
आयपीएल २०२० मध्ये ३ संभाव्य ऑरेंज कॅप विजेते फलंदाज-
१. डेव्हिड वॉर्नर (David Warner)
डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादचा महत्त्वाचा खेळाडू आणि कर्णधार आहे. सुरुवातीच्या फलंदाजांनी धावा केल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या वाढते. वॉर्नरला आयपीएलमध्ये खेळण्याचा खूप चांगला अनुभव आहे. आतापर्यंत त्याने १२६ सामन्यात ४७०६ धावा केल्या आहेत. यात वॉर्नरच्या बॅटमधून ४ शतके आणि ४४ अर्धशतके झळकली आहेत. त्याचे नाव अव्वल फलंदाजांमध्ये दिसून येते. त्याची प्रतिभा आणि अनुभव लक्षात घेता तो आयपीएल२०२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्येही हा अव्वल स्थान मिळवू शकतो.
२. विराट कोहली (Virat Kohli)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमधील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. या हंगामातही तो सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत अव्वल स्थानावर असू शकतो.
त्याने आतापर्यंतच्या १७७ सामन्यात ५४१२ धावा केल्या आहेत. यात कोहलीने ५ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावली आहेत. प्रत्येक हंगामात पुन्हा त्याच्या फलंदाजीतून जबरदस्त खेळ दाखविणारा विराट कोहली इतर संघांच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
३. रोहित शर्मा (Rohit Sharma)
रोहित शर्मा हा एक स्फोटक फलंदाज आणि तो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधारही आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ४ वेळा आयपीएल चषक मुंबई इंडियन्सने आपल्या संघाच्या नावावर केला आहे. जेव्हा जेव्हा त्याची बॅट फिरते तेव्हा तो चेंडू सीमारेषेपार असतो. रोहित शर्माने १८८ आयपीएल सामन्यांमध्ये ४८९८ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने आपल्या फलंदाजीतून एक शतक आणि ३६ अर्धशतके झळकावली आहेत.
जेव्हा ते क्रीजवर असतो तेव्हा इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि संघ यशाच्या शिखरावर असतो. या वेळी आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून सर्वात जास्त धावांची अपेक्षा आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये ३ वेगवेगळ्या संघांकडून अंतिम सामने खेळले हे २ खेळाडू…
आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
वनडेमध्ये वेगवान ४०० बळी मिळवणारे अव्वल ३ गोलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…