तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ २०२०च्या या आयपीएल हंगामात सतत पराभूत होत आहे. संघाची आत्तापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे आणि त्यांनी ७ पैकी ५ सामने गमावले आहेत, तर केवळ २ सामने जिंकले आहेत. पुढील काही सामन्यात त्यांचा पराभव झाल्यास ते स्पर्धेबाहेर जाऊ शकतात.
या आयपीएल हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला होता, जेव्हा सुरेश रैनाने या हंगामातून आपले नाव मागे घेतले होते. आतापर्यंत संघ त्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. सीएसके संघाचा उत्तम अंतिम अकरा संघ अद्याप मैदानात उतरू शकला नाही. अनेक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले. परंतु त्यांनी अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही. त्याच वेळी असे काही खेळाडू आहेत ज्यांना जास्त संधी मिळालेल्या नाहीत पण त्यांना अंतिम अकरामध्ये समाविष्ट केले जावे.
या लेखात ३ खेळाडूंबद्दल सांगत आहोत ज्यांना संघाच्या अंतिम अकरामध्ये चेन्नई सुपर किंग्जने सामील केले पाहिजे. हे खेळाडू संघाला चांगले यश मिळवून देऊ शकतात.
अंतिम अकरामध्ये चेन्नई सुपर किंग्जने संधी द्यावी असे ३ खेळाडू
३. जोश हेझलवूड
या आयपीएल हंगामात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. परंतु अद्याप त्याला जास्त संधी मिळालेली नाही. त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. सीएसकेच्या अंतिम अकरामध्ये जोश हेजलवुडला अधिक संधी मिळायला हवी. स्वत: कर्णधार एमएस धोनीने असे म्हटले आहे की, गोलंदाज पावरप्ले किंवा शेवटच्या ४ षटकांत अधिक धावा करून देतात. अशा परिस्थितीत जोश हेझलवुडसारखे गोलंदाज या षटकांत फार उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच जोश हेजलवुडला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली पाहिजे.
२. मिशेल सॅन्टनर
आणखी एक अनुभवी खेळाडू मिशेल सॅन्टनरला या आयपीएल हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सॅन्टनर हा अष्टपैलू खेळाडू आहे. एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असण्याव्यतिरिक्त तो एक चांगला हिटर देखील आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ हरला आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे संघात मधल्या फळीत चांगली फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांची कमतरता. मिशेल सॅन्टनर शेवटच्या षटकांत येऊन हे काम चांगल्या प्रकारे करू शकेल. याशिवाय सॅन्टनर उत्तम फिरकी गोलंदाजी करतो आणि तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे.
१. इम्रान ताहिर
जर मिशेल सॅन्टनरला अंतिम अकरामध्ये संधी न मिळाल्यास इम्रान ताहिर संधी दिली पाहिजे. ताहिर एक असा खेळाडू आहे जो कोणत्याही सामन्यात आपल्या फिरकीच्या साहाय्याने सामन्याचे चित्र पलटू शकतो. गेल्या हंगामात इम्रान ताहिरनेही शानदार कामगिरी बजावली होती. त्याची मागील कामगिरी बघता त्याला संघात सामील करणे आवश्यक आहे.
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
महत्त्वाच्या बातम्या-
-दुखापतग्रस्त भुवनेश्वर आयपीएलमधून आऊट! हैदराबाद संघात कोणाची लागणार वर्णी? ‘ही’ ३ नावे चर्चेत
-भुवनेश्वर कुमारच्या जागी हैदराबाद संघात निवड झालेला कोण आहे पृथ्वी राज यारा, घ्या जाणून