आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पदार्पण करण्यापूर्वी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडसाठी प्रवास खूपच संघर्षपूर्ण होता. चेपॉकवरून दुबईला रवाना झाल्यानंतर ऋतुराजला तब्बल ३ आठवडे क्वारंटाईन व्हावे लागले होते. परंतु यानंतरही तो खचला नाही. त्याने कर्णधार एमएस धोनीने दिलेल्या सल्ल्याने स्वत: ला सकारात्मक ठेवले. याबद्दल आता त्याने मत व्यक्त केले आहे.
‘प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत करायचा’
“कोव्हिड-१९ने मला आणखी मजबूत बनवले. आमचे कर्णधार सांगतात, ‘प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत करायचा.’ मी सकारात्मक राहिलो आणि भविष्याबाबत जास्त विचार केला नाही,” असे कोव्हिड-१९ च्या परिस्थितीत धोनीने दिलेल्या सल्ल्याबद्दल बोलताना ऋतुराज म्हणाला.
गुरुवारी (२९ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना ऋतुराजने ७२ धावा ठोकत सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला. तो म्हणाला, “मला खूप चांगले वाटत आहे. मी स्वत:ला पाठिंबा दिला. पहिल्या दोन डावांमध्ये मी लवकर बाद झालो. मला माहिती होते की परिस्थिती कठीण आहे.”
ड्रेसिंग रूमचे वातावरण आहे शांत
तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२०च्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. असे असले तरीही ऋतुराज म्हणाला की, ड्रेसिंग रूमचे वातावरण आताही खूपच शांत आहे.
ऋतुराजने संघसहकारी शेन वॉटसनसोबत चर्चा करताना म्हटले की, “निश्चितपणे मला आपला फॉर्म कायम ठेवायचा आहे. सोबतच संघासाठी सामनेही जिंकून द्यायचे आहेत. याव्यतिरिक्त इतर गोष्टी महत्त्वाच्या नाही. आशा आहे, आम्ही विजयासोबत स्पर्धेचा निरोप घेऊ आणि पुढील वर्षीही याच लयीत उत्तम कामगिरी करू.”
तो पुढे बोलताना म्हणाला, “ड्रेसिंग रूमचे वातावरण खूप शांत आहे. असे वाटते नाही की आम्ही स्पर्धेतून बाहेर झालो आहोत. जेव्हा आम्ही पहिला सामना जिंकलो होतो आणि आता हा सामना जिंकलो आहोत, तेव्हाही वातावरण एकसारखे आहे. यामुळे खूप मदद होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
-वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
-CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
-‘पुढच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?’ या प्रश्नावर मॅक्सवेलने दिलं भन्नाट उत्तर
ट्रेंडिंग लेख-
-त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
-भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…