इंडियन प्रीमियर लीगचे 13 वे सत्र अखेरच्या टप्प्यावर पोहोचले आहे. रविवारी (10 नोव्हेंबर) आयपीएल 2020 चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. यापूर्वी चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले आहे. त्याचबरोबर आयपीएलचा अंतिम सामना सहाव्या वेळी गाठला आहे, तर संपूर्ण १३ हंगामात दिल्लीचा संघ प्रथमच अंतिम सामन्यात पोहोचला आहे
गेल्या काही वर्षांत आयपीएलने भारतीय क्रिकेटला उत्तम खेळाडू दिले आहेत. आयपीएल 2020 देखील याला अपवाद नाही. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराने सहा भारतीय युवा खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीची प्रशंसा केली आहे.
ब्रायन लाराने निवडलेले आयपीएल २०२०मधील ६ युवा भारतीय खेळाडू
१. संजू सॅमसन
राजस्थान रॉयल्सचा दमदार फलंदाज संजू सॅमसन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 16 षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याला चांगली खेळी करता आली नाही. लारा म्हणाला, “मला संजूमधील क्षमता आवडते. त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली ती मला आवडली. त्याच्याकडे उत्तम प्रतिभा आहे. त्याचा शॉट टायमिंग आश्चर्यकारक आहे. तो एक अविश्वसनीय खेळाडू आहे. तो एका मोठ्या उंचीवर पोहोचू शकतो. ”
२. सूर्यकुमार यादव
मुंबई इंडियन्सच्या उजव्या हाताच्या या फलंदाजाने १५ सामन्यांत ४१.९० च्या सरासरीने ४६१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १४८.२३ आहे. लारा म्हणाला, “सूर्यकुमार हा माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. जर तुमचा आवडता खेळाडू सलामीला येत नसेल, तर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. जर मुंबईने लवकर गडी गमावला, तर तो डाव सावरू शकतो. त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहणे मला आवडते. ”
३. देवदत्त पडिक्कल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या देवदत्त पड्डिकलबद्दल बोलताना लाराने सांगितले की, “देवदत्त पड्डिकलमध्ये अपार क्षमता आहे. मला त्याच्यामध्ये काही बदल पाहायचे आहेत. जेव्हा मी एखाद्या खेळाडूचे परीक्षण करतो, तेव्हा मला त्याच्याकडून केवळ टी-20 शॉट्स पहायचे नसतात. मला त्याचे कसोटी क्रिकेटचे शॉट्सदेखील बघायला आवडतात. पडिक्कललाही त्याच्या तंत्रावर काम करावे लागेल. तरच तो कसोटी क्रिकेट खेळू शकतो. जेव्हा तीन स्लिप्स आणि गली असते, तेव्हा आपण हुक शॉट्स खेळू शकत नाही. आता त्याला हे कदाचित जमणार नाही म्हणून तो फक्त टी-20 शॉट्स खेळत आहे.”
४. केएल राहुल
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि आतापर्यंत आयपीएलमधील ऑरेंज कॅपचा अव्वल दावेदार राहिलेल्या केएल राहुलबद्दलही लाराने वक्तव्य केले. ब्रायन लारा म्हणाला की, आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित फलंदाज आहे. तो म्हणाला, “निश्चितपणे राहुल एक शानदार खेळाडू बनून राहिला आहे.”
५. प्रियम गर्ग
भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार आणि सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज प्रियम गर्गनेदेखील ब्रायन लाराचे लक्ष वेधले आहे. लारा म्हणाला, “मला वाटते प्रियममध्येही बरीच क्षमता आहे.”
६. अब्दुल समद
जम्मू काश्मीरचा अष्टपैलू अब्दुल समदने यावर्षी सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएल २०२०चा सर्वात युवा प्रतिभावान फलंदाज म्हणून लाराने आश्चर्यचकित करणारे त्याचे वर्णन केले आहे.
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण