आयपीएल 2020 च्या ‘क्वालिफायर2’ सामन्यात रविवारी (9 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला 17 धावांनी पराभूत केले. दिल्लीच्या संघाला विजय मिळवून देण्यात त्यांच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. दिल्लीचे आक्रमक झालेले हे खेळाडू मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्यात भारी पडू शकतात.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेली आहे. मुंबईने 13 वर्षांत सहाव्यांदा अंतिम सामन्यात मजल मारली आहे, तर दिल्लीच्या संघाचा हा पहिला आयपीएल अंतिम सामना आहे. 2020 च्या हंगामात मुंबई आणि दिल्ली संघात झालेले सर्व सामने मुंबईने जिंकले असून अंतिम सामन्याच्या रुपात दोन्ही संघ या हंगामात चौथ्यांदा समोरासमोर येणार आहेत.
मुंबई आणि दिल्ली या संघात आतापर्यंत 27 सामने झाले असून मुंबईने 15, तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघात असलेल्या आकड्यात मुंबई दोन पाऊल पुढे असली, तरी हा अंतिम सामना जिंकून पहिला आयपीएल किताब जिंकण्यासाठी दिल्लीचा संघ चांगलीच मेहनत घेणार आहे.
आक्रमक अंदाजात असलेले दिल्ली कॅपिटल्सचे चार खेळाडू
1. शिखर धवन
दिल्लीचा सलामीचा फलंदाज शिखर धवन आता अधिकच आक्रमकपणे खेळताना दिसतोय. हंगामाच्या सुरुवातीला काहीसा मरगळलेला खेळ करणारा धवन आता आक्रमकपणे धावा बनविताना दिसत आहे. दिल्लीचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे हे फलंदाजीत अपयशी ठरत असताना धवन मात्र उत्तम खेळ करताना दिसत आहे. धवनने या हंगामात 2 शतक व 4 अर्धशतकांसह 603 धावा केल्या आहेत.
ऑरेंज कॅप (के एल राहुल 670) पासून तो 68 धावा दूर आहे. 2016 साली सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 501 धावा केल्या होत्या. त्याच्या या योगदानासह हैदराबादचा संघ आयपीएल स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला होता. आता मुंबई विरुद्धच्या सामन्यात शिखर धवन हा दिल्लीसाठी महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.
2. मार्कस स्टॉयनिस
असमाधानकारक कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने रिलीझ केल्यानंतर स्टॉयनिसला दिल्लीने आपल्या संघात घेतले. दिल्लीत आल्यानंतर स्टॉयनिसने अगदी पहिल्या सामन्यापासूनच संघाला आपल्या अष्टपैलू खेळाने प्रभावित केले आहे. स्टॉयनिसने संपूर्ण हंगामात 352 धावा करीत 12 बळी घेतले आहेत. दिल्लीसाठी तो आता एक समालीचा फलंदाज म्हणून अंतिम सामन्यातही दिसू शकतो. अशात मुंबईला फलंदाजी व गोलंदाजी करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
3. कागिसो रबाडा
आयपीएल 2019 व 2020 च्या दोन्ही हंगामात कागिसो रबाडाने जबरदस्त कामगिरी केली आहे. 2019 साली त्याने 25 बळी घेतले होते, तर या हंगामात त्याने आतापर्यंत 29 बळी घेतले आहेत. हैदराबादविरुद्ध झालेल्या क्वालिफायर 2 च्या सामन्यात त्याने 4 बळी घेत अंतिम सामन्यात पर्पल कॅप घालून खेळण्याचा मान मिळवला आहे. अन्यथा जसप्रीत बुमराह अंतिम सामन्यात पर्पल कॅपसह खेळताना दिसला असता. आता याच सामन्याच्या शेवटी ही कॅप शेवटी कुणाकडे राहणार, हे सिद्ध होणार आहे. आयपीएल किताब व पर्पल कॅप या दोन्हीच्या मागावर असलेला रबाडा मुंबईच्या फलंदाजांना मात्र त्रासदायक ठरू शकतो.
4. शिमरॉन हेटमायर
कोणत्याही वेळी काहीही करून समोरील संघाला अचानकपणे गुंतवून पाडण्याचे काम हेटमायर आधीपासूनच करत आला आहे. मिळालेल्या संधीचे सोने बहुतेक वेळा हेटमायर करतो. क्वालिफायर 2 च्या सामन्यात त्याने 22 चेंडूत 42 धावांची खेळी केली होती. त्याचे फॉर्ममध्ये असणे समोरील संघासाठी धोकादायक ठरू शकते.
ट्रेंडिंग लेख-
एकेकाळी रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करणारा बनला टीम इंडियाचा थ्रो-डाउन विशेषज्ञ
हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला शिखर धवन; नावावर केले ३ खास विक्रम
IPL 2020 : या ५ कारणांमुळे मुंबई इंडियन्स जिंकू शकतात पाचवे विजेतेपद
महत्त्वाच्या बातम्या-
Qualifier 2 : कागिसो रबाडाच्या स्विंगमुळे वॉर्नरची दांडी गुल, पाहा व्हिडिओ
मुंबई विरुद्ध ‘ही’ रणनीती वापरणार दिल्लीचा संघ, कर्णधार श्रेयस अय्यरचा खुलासा
‘पंड्या’ ब्रदर्समध्ये कोण आहे सर्वात स्मार्ट? कायरन पोलार्डने घेतले ‘हे’ ना