आयपीएल २०२०ला १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. परंतु आयपीएलला बऱ्याच कठीण समस्येतून जावे लागत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएलच्या काही फ्रंचायझींनी आपापले मुख्य प्रायोजक गमावले आहेत आणि नवीन प्रायोजक शोधत आहेत.
आयपीएल फ्रंचायझीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “स्पर्धा पुन्हा सुरू होणे ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. परंतु प्रायोजकांच्या कमतरतेमुळे आम्हाला समस्या चिंता सतावत आहे. मोसमापूर्वी आम्ही आमच्या एकूण ९५ टक्के गोष्टी विकल्या आहेत. सध्याच्या काळात आमच्याकडे प्रायोजकही नाहीत.”
मागील हंगामात फ्रंचायझींची एकूण कमाई होती १६०० कोटी रुपये
मागील मोसमात प्रत्येक फ्रंचायझी संघाने जवळपास २०० कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच सर्व फ्रंचायझी संघांनी जवळपास १६०० कोटी रुपये कमाई केली होती. फ्रंचायझींचा संपूर्ण साठाही विकला गेला नाही. म्हणजेच त्यांना जवळपास ८० कोटीचा तोटा आधीपासूनच झाला आहे.
सणांच्या हंगामात वाढल्यात अपेक्षा
“गेल्या हंगामात ज्या करारावर स्वाक्षरी झाली होती, त्यासाठी प्रायोजक शोधणे सध्या अवघड आहे. सणांच्या हंगामात स्पर्धा होत आहे, तर आशा आहे की जे प्रायोजक आम्ही गमावले होते, ते पुन्हा मिळतील,” असे एका फ्रंचायझीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने म्हटले.
ना हरकत प्रमाणपत्रानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या खेळण्याबाबत संभ्रम
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही (Cricket South Africa) आपल्या १० खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. असे असले तरीही दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत वाढत असलेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव. दक्षिण आफ्रिकेत सध्या लॉकडाऊन आहे. मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही पूर्णपणे बंद आहेत.
कोरोना व्हायरसचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव पाहता कोणालाही माहीत नाही, की विमानसेवा केव्हा सुरू होतील. अशामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआय किंवा आयपीएल फ्रंचायझींना विशेष व्यवस्था कराव्या लागतील. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे माध्यम व्यवस्थापक कोकेटो गॉफेटोगे म्हणाले, “बोर्डाने खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र सोपविले आहे. परंतु लॉजिस्टिक्स आमच्या हातात नाही.”
दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसची प्रकरणे ४.४० लाखांपेक्षाही अधिक आहेत.
महत्वाच्या बातम्या –
-आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा
-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
-फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव
ट्रेंडिंग लेख –
-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार
-२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद…
-आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी