---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२० स्पर्धा होणार रद्द?

On: मंगळवार, मार्च 10, 2020 1:10 PM
---Advertisement---

जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे.  त्यातच आयपीएलचा 13 वा हंगामही अगदीच जवळ आला आहे. अशामध्ये कोरोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएल न होण्याच्या चर्चांना उधान आले आहे.

या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की, भारतात आलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) बीसीसीआय गंभीर आहे. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर येऊ घातलेली आयपीएल (IPL 2020) टी20 स्पर्धा रद्द करण्यात येऊ शकते.

बीसीसीआयच्या सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, “आयपीएल सुरु होण्यासाठी अजून बराच वेळ आहे. आतापर्यंत आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही परिस्थितीवर गंभीरपणे लक्ष देत आहोत. तसेच आम्ही सर्व सावधगिरी बाळगू.”

या व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत जगातील जवळपास 3800 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे एकट्या चीनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 3 हजारपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

याव्यतिरिक्त इटलीमध्ये आतापर्यंत 366 आणि अमेरिकेत 21 लोकांना या व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतात आतापर्यंत 42 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक खेळांचे आयोजन अगोदरच रद्द करण्यात आले आहेत. कित्येक सामन्यांचे आयोजन प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत करण्यात येत आहेत. तसेच यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांनाही या व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---