अबु धाबी येथे बुधवारी (२८ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा ४८ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. हा सामना मुंबईने ५ विकेट्सने जिंकला. या विजयात सूर्यकुमार यादवने मोलाची कामगिरी केली. त्याच्या कामगिरीमुळे मुंबईने २ गुण मिळवले. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई संघ १६ गुणांसह अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्यांचा रनरेट हा +१.१८६ इतका आहे.
नाणेफेक जिंकत मुंबई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बेंगलोर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. या धावांचे आव्हान मुंबईने १९.१ षटकात ५ विकेट्स गमावत १६६ धावा करत पूर्ण केले.
मुंबई संघाकडून फलंदाजी करताना धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्तम खेळी केली. त्याने ४३ चेंडूत सर्वाधिक ७९ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच इशान किशननेही २५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर इतर फलंदाज २० धावांच्या आतच गारद झाले.
बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. यासोबतच ख्रिस मॉरिसनेही एक विकेट आपल्या खिशात घातली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने चमकदार कामगिरी केली. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ७४ धावा कुटल्या. त्याच्यासोबत जॉश फिलिपनेही ३३ धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला २० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही.
मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना केवळ १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी एक विकेट खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल २०२० च्या प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ ठिकाणी रंगणार फायनलचा थरार
-आयपीएलमध्ये बळींचे शतक पूर्ण करणाऱ्या ‘बुमराह’सोबत अनोखा योगायोग; वाचून शाॅक व्हाल
-आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेला सुरेश रैना ‘या’ टीव्ही शोमधून येणार चाहत्यांच्या भेटीला
ट्रेंडिंग लेख-
-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय