---Advertisement---

आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेला सुरेश रैना ‘या’ टीव्ही शोमधून येणार चाहत्यांच्या भेटीला

On: बुधवार, ऑक्टोबर 28, 2020 8:56 PM
---Advertisement---

सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्सचा अतिमहत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. कर्णधार एमएस धोनी प्रमाणेच त्याचेही या संघासाठी खूप मोठे योगदान आहे. शिवाय त्याचे आयपीएलमधील आकडे देखील मोठे आहेत. परंतु असे असले तरी त्याने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२० च्या हंगामातून माघार घेतली आहे. आता तो ‘कपिल शर्मा शो’ मधून सर्वांच्या भेटीला येणार आहे.

‘कपिल शर्मा शो’ च्या एका एपिसोड मध्ये रैना दांपत्य

सुरेश रैनाने फोटो पोस्ट केले होते. ज्यात तो त्याच्या पत्नी समवेत कपिल शर्मा शो मध्ये असल्याचे दिसत आहे. फोटोला कॅप्शन देत त्याने म्हटले की, “हा खूप चांगला शो आहे आणि कपिल शर्माही खूप चांगला होस्ट आहे. तो व त्याची टीम खूप छान आहे. या सर्वासाठी धन्यवाद.”

रैनाच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते या एपिसोडसाठी आतुर झालेले आहेत. हा भाग येत्या आठवड्यात प्रदर्शित केला जाणार आहे. याच भागात चेन्नईसाठी न खेळण्याबाबत प्रश्न असू विचारले जाऊ शकतात, अशी सर्वांना आशा आहे.

घरी आल्या नंतर चेन्नईचा प्रत्येक सामना पाहतो रैना

बाहेरून घरी आल्यानंतर रैना चेन्नईचा प्रत्येक सामना पाहतो. सामना संपल्यावर तो ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देतो. यावर त्याचे चाहते तू जर संघात असता, तर चेन्नई जिंकली असती, अशा बहुतेक कमेंट्स करतात.

रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नईकडून खराब कामगिरी

चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांत त्यांना फक्त ४ सामने जिंकता आले आहेत. उर्वरित ८ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईला प्लेऑफ च्या बाहेर रहावे लागत आहे. आणि रैना संघात तर हे झाले नसते, असे काही चाहते आता म्हणू लागले आहेत.

रैना आणि हरभजन परतले स्वदेशी

सुरेश रैना बरोबरच चेन्नईचा फिरकीपटू हरभजन सिंगने देखील आपले नाव आयपीएल स्पर्धेतून मागे घेतले होते. यासाठी दोघांनीही वैयक्तिक कारणे सांगितली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-सुरेश रैनाने ‘या’ युवा भारतीय खेळाडूला एका गुरूप्रमाणे दिले आहे प्रशिक्षण

-यंदा आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने सीएसकेला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला…

-सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांचा लागला तपास;  तिघा जणांना झाली अटक

ट्रेंडिंग लेख-

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---