अबु धाबीच्या मैदानावर बुधवारी (२८ ऑक्टोबर) जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील रंगतदार लढत झाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात ही लढत झाली. दरम्यान मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा पराक्रम केला.
झाले असे की, नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटला बुमराहने केवळ ९ धावांवर पव्हेलियनला रवाना केले. ही बुमराहची आयपीएल कारकिर्दीतील तब्बल १००वी विकेट होती.
यासह बुमराह आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहभागी झाला आहे. त्याच्यापुर्वी तब्बल १५ गोलंदाजांनी हा कारनामा केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बुमराहने विराट कोहलीचीच पहिली विकेट घेत आयपीएलमध्ये खाते उघडले होते. ४ एप्रिल २०१३ रोजी बेंगलोरविरुद्धच्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात त्याने हा कारनामा केला होता. त्यामुळे विराट हा बुमराहचा आयपीएलमधील पहिला आणि १००वा बळी (विकेट) ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘या’ यादीत पटकावलं अव्वल स्थान
प्लेऑफ आधी हैदराबादवर ओढवलं संकट; मॅच विनिंग खेळी करणारा खेळाडू दुखापतग्रस्त
Video: दिल्लीविरुद्धचा सामना वॉर्नरसाठी ठरला खास; रात्री वाढदिवसाचा ‘असा’ घेतला आनंद
ट्रेंडिंग लेख-
SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय