आयपीएल २०२० चा ४५ वा सामना रविवारी (२५ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने ८ विकेट्सने जिंकला. हा राजस्थानचा या हंगामातील पाचवा विजय होता. राजस्थानच्या या विजयाचा बेन स्टोक्सने मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाणेफेक जिंकून मुंबई संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईचे १९६ धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्स संघाने केवळ २ विकेट्स गमावत आणि १० चेंडू शिल्लक ठेवत लिलया पूर्ण केले.
राजस्थान संघाकडून फलंदाजी करताना बेन स्टोक्सने उल्लेखनीय खेळी केली. त्याने ६० चेंडूत नाबाद सर्वाधिक १०७ धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि १४ चौकार ठोकले. यासोबतच यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसननेही महत्त्वपूर्ण खेळी करत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त सलामीवीर रॉबिन उथप्पा (१३) आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने (११) धावाच केल्या.
मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सननेच सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी मुंबई संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अष्टपैलू हार्दिक पंड्याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २१ चेंडू खेळत ६० धावा कुटल्या. या धावा करताना त्याने २ चौकार आणि ७ षटकार ठोकले. त्याच्यासोबतच सूर्यकुमार यादव (४०), ईशान किशन (३७) आणि सौरभ तिवारी (३४) धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. यासोबतच कार्तिक त्यागीनेही ईशान किशनला बाद करत महत्त्वपूर्ण एक विकेट आपल्या खिशात घातली.
गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर
राजस्थान संघाने या विजयानंतर २ गुण मिळवले. या गुणांचा फायदा घेत त्यांचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-अखेर सूर्यकुमार यादवची प्रतिक्षा संपली, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व?
-‘हार्दिक’ नावाचं वादळ ! अवघ्या २० चेंडूत झळकावले विक्रमी अर्धशतक
-अबब! आर्चरने इशान किशनचा घेतलेला झेल पाहून सगळ्यांच्याच बत्त्या झाल्या गुल
ट्रेंडिंग लेख-
-चौकारांशिवाय अर्धशतक…!! आयपीएलमध्ये या ५ फलंदाजांनी केलाय हा कारनामा
-आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी