29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या आयपीएलच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी लवकरच चेन्नईमध्ये सरावाला सुरुवात करणार आहे. यासाठी तो रविवारी (1 मार्च) चेन्नईमध्ये पोहचला आहे.
धोनी चेन्नईमध्ये पोहचल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत झाले आहे. धोनीचा चेन्नईला पोहचल्यानंतरचा फोटो आणि व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले आहेत. धोनीबरोबरच चेन्नई सुपर किंग्सचे अन्य काही खेळाडूही चेन्नईला पोहचले आहेत. यात अंबाती रायडू, पियुष चावला, कर्ण शर्मा या खेळाडूंचा समावेश आहे.
चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की धोनीला चाहत्यांनी गराडा घातला आहे. तसेच धोनीसमवेत चेन्नई सुपर किंग्सचे संघ व्यवस्थापक रसेल राधाक्रिष्णन देखील आहेत. यावेळी धोनीला पिवळ्या फुलांचा पुष्पगुच्छही देण्यात आला. त्याचबरोबर धोनीने हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर सर्व गोष्टींची पहाणी केली.
Every goose shall bump with First Day First Show feels! Just #StartTheWhistles! #HomeSweetDen ???????? pic.twitter.com/DpQBIqahZe
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2020
आता धोनी आजपासून त्याच्या सरावाला सुरुवात करेल अशी चर्चा आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या पूर्ण ट्रेनिंग कॅम्पला 19 मार्चपासून सुरुवात होईल. त्यावेळी संघातील सर्व खेळाडू एकत्र येतील, अशी माहिती सीएसकेचे सीईओ केेस विश्वनाथन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
Our brand-new PC is all #yellove! Here's welcoming Piyush Chawla into the #SuperFam! #HomeSweetDen ???????? pic.twitter.com/NBrvzgmROx
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2020
The first thing you do when you return to the #HomeSweetDen. #WhistlePodu ???????? pic.twitter.com/LlycQzLlMj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2020
A Bahubali of an opening at the #HomeSweetDen! #WhistlePodu ???????? pic.twitter.com/6HIUyhJ25L
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2020
धोनीने जुलै 2019च्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने त्याला वार्षिक मानधन करारातूनही वगळले आहे. त्यामुळे धोनीच्या भविष्याबद्दल भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चा होत आहे.
असे असले तरी आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व करताना दिसणार आहे. यावर्षीच्या आयपीएल 2020 मध्ये 29 मार्चला वानखेडे येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला सामना पार पडणार आहे. या सामन्यातून धोनी जवळजवळ 8 महिन्यांनी क्रिकेट खेळताना चाहत्यांना दिसेल.
जेव्हा कॅप्टन कोहली बनतो गोलंदाज, पहा व्हिडिओ
वाचा????https://t.co/44NUqcVmNY????#म #मराठी #cricket #TeamIndia #NZvIND #NZvsIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020
भारताच्या कसोटी इतिहासात असा बाद होणारा बुमराह पहिलाच क्रिकेटर
वाचा????https://t.co/JqX0SA517f????#म #मराठी #cricket #TeamIndia #NZvIND @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020






