लॉकडाऊनमध्ये नितीश राणा या स्टार खेळाडूने सरावासाठी अजब शक्कल लढवली. ‘कोलकत्ता नाईट रायडर्स’ संघाचा सध्याचा सलामीवीर फलंदाज नितीश राणा लॉकडाऊनच्या काळात त्याची पत्नी साची मारवाहबरोबर टेरेसवर क्रिकेटचा सराव करायचा.
याच राणाने गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध 61 चेंडूत धडाकेबाज 87 धावा केल्या. ज्यात 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
https://www.instagram.com/tv/B-uHFaQBOzL/?utm_source=ig_embed
लॉकडाऊन दरम्यान केला गच्चीत सराव
लॉकडाऊन दरम्यान नितीशने गच्चीत सराव केला. तेव्हा खेळाडूंना किंवा नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई होती. त्यामुळे सराव चांगला व्हावा व फिटनेस चांगला राहावा म्हणून नितीशने घराच्याच गच्चीत सराव केला. यावेळी त्याची पत्नीने त्याला गोलंदाजी केली.
नितीश राणाचा आयपीएलमध्ये एक वेगळा विक्रम
चेन्नई विरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर नितीश राणाच्या नावावर एक अनोखा विक्रम बनला आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकवणारा ‘अनकॅप्ड खेळाडू’ (आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजूनही पदार्पण न केलेला खेळाडू) असा त्याच्या नावे नवा विक्रम बनला आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत 11 अर्धशतके ठोकली असुन त्याच्यानंतर 10 शतके ठोकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवचे नाव आहे.
आयपीएलच्या या हंगामात एका सामन्यात केकेआरकडून सर्वाधिक धावा करणारा नितीश राणा अव्वल खेळाडू ठरला आहे. त्याने 87 धावा केल्या असून त्याच्या अगोदर राहुल त्रिपाठीची 81 धावांची खेळी आहे. नितीश राणाने आयपीएलच्या हंगामात मधल्या फळीत खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु तो आता सलामीला येऊन धावा बनविण्यास यशस्वी ठरत असून कोलकातासाठी ही समाधानाची बाब आहे. यात त्याने तीन सामन्यांत दोन अर्धशतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-व्हिडीओ: मॅक्सवेलच्या फिरकीत अडकला नितीश राणा, पहिल्याच षटकात दाखवला तंबूचा रस्ता
-वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
-दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकताच नितीश राणा झाला भावुक; सासऱ्यांच्या नावाची जर्सी फडकावत…
ट्रेंडिंग लेख-
-त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
-भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…