आयपीएल २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय-पराजयाचे चढ-उतार करत अडखळत का होईना पण शेवटपर्यंत आपले स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. ते सध्या १३ सामन्यांतील ६ विजयांसह १२ गुण मिळवून गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहेत. हैदराबादने त्यांच्या मागील २ सामन्यांत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे त्यांचे आव्हान टिकून ठेवले आहे. आता त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याचीही संधी आहे.
सनरायझर्स हैदराबादसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची अशी असतील समीकरणे –
सनरायझर्स हैदराबादने आत्तापर्यंत या हंगामात साखळी फेरीतील १३ सामने खेळले आहेत. त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना गुणतालिकेतील अव्वल क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. हैदराबाद समोरील समीकरण अगदी सोपे आहे, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल.
जर हा विजय मिळवला तर ते प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करतील. कारण हैदराबादचा नेटरनरेट १४ गुण असणाऱ्या सर्व संघांमध्ये सर्वाधिक आहे. मात्र या सामन्यात पराभव झाला तर हैदराबादसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे सर्व दरवाजे बंद होतील आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर जावे लागेल.
मुंबई आणि हैदराबाद संघात होणारा सामना आयपीएल२०२० च्या हंगामातीलही साखळी फेरीचा अखेरचा सामना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नाईकी ऐवजी आता ‘हा’ लोगो दिसणार टीम इंडियाच्या जर्सीवर
अय्यरच्या दिल्ली सेनेला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी द्यावी लागेल अग्निपरिक्षा, अशी आहेत समीकरणे
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ