शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएल२०२० मधील ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. हा सामना राजस्थानने ७ विकेट्सने जिंकल. या विजयामुळे राजस्थान १२ गुणांसह गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आले आहेत. तर पंजाब चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
असे असले तरी आता पंजाब, राजस्थान आणि कोलकाता यांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. तर केवळ मुंबई इंडियन्स १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे अन्य ३ जागांसाठी ६ संघ स्पर्धा करत आहेत. चेन्नई सुपर किंग्स याआधीच या स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
या आयपीएल२०२० मधील ५० व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल-
१- मुंबई इंडियन्स: (सामने १३, विजय ८, पराभव ४, गुण १६, नेट रन रेट +१.१८६)
२- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने १२, विजय ७, पराभव ५, गुण १४, नेट रन रेट +०.०४८)
३- दिल्ली कॅपिटल्स : (सामने १२, विजय ७, पराभव ५, गुण १४, नेट रन रेट +०.०३०)
४- किंग्स XI पंजाब : (सामने १३, विजय ६, पराभव ७, गुण १२, नेट रन रेट -०.१३३)
५- राजस्थान रॉयल्स : (सामने १३, विजय ६, पराभव ७, गुण १२, नेट रन रेट -०.३७७)
६- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने १३, विजय ६, पराभव ७, गुण १२, नेट रन रेट -०.४६७)
७-सनरायझर्स हैदराबाद : (सामने १२, विजय ५, पराभव ७, गुण १०, नेट रन रेट +०.३९६)
८- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने १३, विजय ५, पराभव ८, गुण १०, नेट रन रेट -०.५३२)