मुंबई । युएईमध्ये होणार्या आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी चाहत्यांना अजून वाट पहावी लागणार आहे. शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक पहायला मिळेल, अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा होती, पण अद्याप काहीच हाती लागले नाही. हे वेळापत्रक रविवारी, 6 सप्टेंबर रोजी जाहीर केले जाईल, अशी माहिती प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 4 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगितले होते.
तथापि, उद्घाटन सामन्याची आणि या स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या तारखेची घोषणा बीसीसीआयने आधीच केली आहे. 19 सप्टेंबरला रोजी आयपीएलचा पहिला सामना तर अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. पहिला सामना संध्याकाळी आठ ऐवजी साडेसात वाजता सुरू होईल.
बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्नर कौन्सिलने या आयपीएलचे वेळापत्रक 30 ऑगस्ट रोजी जाहीर करण्याची योजना आखली होती, परंतु चेन्नई सुपरकिंग्जच्या गटातील अचानक 13 सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या कार्यक्रमात फेरबदल करावा लागला.
एका फ्रँचायझी अधिकार्याने सांगितले की, बीसीसीआयने खेळाडू, अधिकारी आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यासाठी हेल्थ अॅप तयार केले आहे. प्रत्येक व्यक्तीस या आरोग्य अॅपमध्ये दररोज आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती द्यावी लागते. विशेषतः आपल्या शरीराचे तापमान सांगण्यासाठी. हेल्थ अॅप चांगले असल्याचे अधिकार्यांने सांगितले.
सदर अॅप खेळाडूंना कोरोना संक्रमणाच्या जोखमीबद्दल अगोदरच सतर्क करते. त्याच्या मदतीने खेळाडू आपल्या स्वत: च्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतो. यासाठी, आपल्याला अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल आणि आपल्या शरीराचे तापमान प्रविष्ट करावे लागेल आणि ते इतर गोष्टींबद्दल माहिती सांगते.
संपूर्ण स्पर्धेत 20,000 कोविड टेस्ट करण्याचे बोर्डाने लक्ष्य ठेवले आहे. या टेस्टवर 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर आता संघाना क्वारंटाइन शिवाय अबू धाबी, शारजाह आणि दुबईमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता संघ कोणत्याही निर्बंधाशिवाय या तीन शहरांना सामने खेळण्यासाठी प्रवास करु शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅट दुरुस्त केलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर आला पुढे; केली ‘ही’ मदत
या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या क्रिकेट बोर्डाला म्हणाले, ‘उशीर होण्याआधीच क्रिकेटला वाचवा’
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये व्हावेत ‘हे’ बदल, या दिग्गजाचा सल्ला
ट्रेंडिंग लेख –
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही