आयपीएल २०२० चा २९ वा सामना मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. हा सामना चेन्नईने २० धावांनी जिंकला. या हंगामातील चेन्नईचा हा तिसरा विजय होता. या विजयाचा हीरो रवींद्र जडेजा ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकून चेन्नईने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६७ धावा केल्या. चेन्नईच्या या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने ८ विकेट्स गमावत केवळ १४७ धावाच केल्या.
यादरम्यान हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना केन विलियम्सनने सर्वाधिक धावा कुटल्या. त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ७ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्याच्यासोबतच यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोने २३ धावा केल्या. या फलंदाजांव्यतिरिक्त इतर फलंदाज २० धावांच्या आतच तंबूत परतले.
चेन्नईकडून संघाकडून गोलंदाजी करताना ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सोबतच सॅम करन, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून शेन वॉटसनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३८ चेंडू खेळत ४२ धावा केल्या. यामध्ये १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सोबतच अंबाती रायडूनेही चांगली खेळी करत ३४ चेंडूत ४१ धावा कुटल्या. सॅम करनला या सामन्यात सलामीला फलंदाजीला पाठवले होते. त्याने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा (२५) आणि कर्णधार एमएस धोनीने (२१) धावा केल्या.
हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना संदीप शर्मा, खलील अहमद आणि टी नटराजनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
या विजयानंतर चेन्नई संघाला २ गुणांचा फायदा झाला आहे. यासह ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
-चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स: पराभवानंतरही चेन्नईच्या खेळाडूंनी ‘हे’ विक्रम केले नावावर
-चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात
ट्रेंडिंग लेख-
एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’
आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू