दुबई| रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) मधील क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. दुबई आणि अबुधाबीच्या खेळपट्ट्यांवर 150-160 धावा आव्हानात्मक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मागील आयपीएल हंगामात आरसीबी संघाविरूद्ध अखेरच्या षटकात बऱ्याच धावा प्रतिस्पर्ध्यांनी जमविल्या होत्या. “या वेळी मला अशा गोलंदाजांची ओळख पटली आहे जे चांगली गोलंदाजी करतील”, असे हेसन यांनी सांगितले.
आरसीबीच्या यूट्यूब वाहिनीवर हेसन यांनी सांगितले की, “काही मैदानावर 150-160 ही धावसंख्या चांगली मानली जाईल. येथे एक वेगळे वातावरण असेल. चिन्नास्वामी मैदान (बेंगलोर) फलंदाजीसाठी उत्तम आहे. तेथे छोटी सीमा आहे ज्यामुळे मोठी धावसंख्या बनते.”
मैदानांच्या परिस्थिती बद्दल बोलताना हेसन म्हणाले, “हो, काही मैदानाची परिस्थिती फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरेल. हे बर्याच गोष्टींवर अवलंबून आहे. अबू धाबीच्या तुलनेत उर्वरित दोन्ही मैदानात (दुबई आणि शारजाह) फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे कारण चेंडू तेथे ‘स्किड’ करेल. आम्हाला दररोजच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.”
“अबू धाबीसारख्या क्षेत्रात शेवटच्या षटकांत गोलंदाजी करणे हे चिन्नास्वामीपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. आम्ही चांगल्या गोलंदाजांना ओळखले आहे.”असे हेसन यांनी पुढे सांगितले.
2016 मध्ये अंतिम सामना खेळल्यानंतर आरसीबी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे पण यावेळी संघ अधिक चांगल्या स्थितीत असल्याचा प्रशिक्षकांचा विश्वास आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व
…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही
इंस्टाग्रामच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सची भरारी! अगदी सीएसकेही…
ट्रेंडिंग लेख –
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे