चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना आयपीएल 2020 मधून बाहेर आला आहे. वैयक्तिक कारणांमुळे रैना आयपीएलच्या 13 व्या सत्रात भाग घेऊ शकणार नाही. सीएसके फ्रेंचायजिने शनिवारी ही माहिती दिली. 33 वर्षीय या क्रिकेटपटूने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.
सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी ट्विट केले की, “सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे आणि आयपीएलच्या उर्वरित भागासाठी उपलब्ध होणार नाही, यावेळी चेन्नई सुपर किंग्ज सुरेश आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य देईल,”
सीएसकेची टीम आधीच अडचणीत सापडली आहे. कोविड 19 च्या चाचणीत भारतीय संघाचा टी -२० विशेषज्ञ वेगवान गोलंदाज आणि संघाचे 12 सदस्य पॉसीटिव आले आहेत. त्यानंतर संघाने आपला क्वारंटाईन कालावधी 1 सप्टेंबरपर्यंत वाढविला आहे. भारतात कोविड-19 च्या वाढत्या घटनांमुळे आयपीएलचा आगामी हंगाम 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होत आहे.
रैना आयपीएलमधून बाहेर पडल्यावर इरफान पठाणने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इरफानने ट्विट करुन लिहिले आहे की रैनाचे बाहेर पडणे म्हणजे चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. पण मी माझ्या मित्रासाठी प्रार्थना करीत आहे, जो वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
Big blow to @ChennaiIPL but I wish and pray for my friend @ImRaina who pulled out from the upcoming ipl for personal reasons.
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 29, 2020
ही पहिली वेळ असेल जेव्हा रैना आयपीएल खेळू शकणार नाही. आयपीएलच्या इतिहासात रैना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. 2008 पासून रैना आयपीएलचा एक भाग आहे. 2020 च्या आयपीएलमध्येही रैना खूप उत्सुक होता. यासाठी त्याने जोरदार सराव देखील केला होता.
ट्विटरवर रैना आयपीएलमध्ये न खेळण्याची बातमी समजताच लोक ट्वीटद्वारे सतत आपली प्रतिक्रिया देत आहेत. प्रख्यात समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले आहे की, “रैनाने सीएसकेसाठी या आयपीएलमध्ये भाग न घेणे ही मोठी हानी आहे. गेल्या महिन्यातच त्यांच्याशी बोललो होतो, तो आयपीएलमध्ये खेळण्याबद्दल खूप उत्सुक होता. सीएसके आणि रैना एकमेकांना जोडलेले आहेत. निश्चितच सीएसकेचे हे सर्वात मोठे नुकसान आहे.”
त्याचबरोबर ट्विटरवर चाहतेही आश्चर्यचकित आहेत, चाहते सतत ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया देत आहेत. आयपीएलमध्ये रैना आतापर्यंत 193 सामने खेळला असून या काळात त्याने 5368 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात रैना हा सर्वाधिक सामने खेळलेला क्रिकेटपटूही आहे. आयपीएलमध्ये 190 सामने खेळलेला एमएस धोनी देखील रैनाच्या मागे आहे.