आयपीएलच्या १३ व्या हंगामाला अजून सुरुवात झाली नाही. आयपीएल २०२० ची लोकांना प्रतीक्षा आहे. मागील हंगामात अनेक फलंदाजांनी घातक फलंदाजी करताना अनेक पराक्रम केले होते आणि यावेळीही त्यांच्याकडून तशीच अपेक्षा आहे. आयपीएल २०२० यंदा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान यूएई मध्ये खेळली जाईल.
आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली तर असे संघ आहेत, ज्यांच्या फलंदाजांनी जबरदस्त धावा केल्या आणि विरोधी संघासमोर मोठे लक्ष्य ठेवले. इतकेच नव्हे तर फलंदाजांनी या शानदार कामगिरीदरम्यान भरपूर धावा केल्या आणि सोबाबतच षटकार आणि चौकारांचा पाऊसदेखील पाडला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत १२५ सामन्यात ३२६ षटकार ठोकले आहेत. सद्यस्थितीत कोणताही फलंदाज त्याच्या विक्रमाच्या आसपास नाही.
या लेखात आपण अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ या जे आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम करू शकतात.
१. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
हार्दिक पांड्याने स्वत: ला अल्पावधीत जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणून सिद्ध केले आहे. टी-२० क्रिकेटमधील त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून केकेआरविरुद्ध त्याने ३४ चेंडूंमध्ये ९१ धावांची शानदार खेळी केली होती.
आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ६६ सामन्यांत १५४ च्या अधिक स्ट्राईक रेटने ६८ षटकारांसह १०६८ धावा केल्या आहेत. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पांड्याने डीवाय पाटील टी-२० चषकादरम्यान ५५ चेंडूत २० षटकार ठोकून १५८ धावांची जबरदस्त शतकी खेळी केली.
आयपीएल कारकिर्दीत पांड्याने आत्तापर्यंत ६८ षटकार मारले असून आयपीएल २०१९ मध्ये पांड्या सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज होता. गेल्या हंगामात त्याने १६ सामन्यांत २९ षटकार ठोकले होते. तर आयपीएल २०२० मध्ये तो सर्वाधिक षटकारही लगावू शकतो.
२. ख्रिस लिन (Chris Lynn)
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ख्रिस लिनला यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने सोडून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पण ख्रिस लिनसारख्या स्फोटक फलंदाजाला लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.
२०१२ च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून पदार्पण करणाऱ्या ख्रिस लिनने गेल्या दोन मोसमात शानदार प्रदर्शन केले. तो २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. त्याने कोलकाता संघाकडून १३ सामन्यात १३९.६५ च्या स्ट्राईक रेटने ४०५ धावा केल्या, तर २०१८ मध्ये लिनने १६ सामन्यांत ४९१ धावा केल्या.
आयपीएलमध्ये २०१९ला लिनने २२ षटकार ठोकले होते, तर त्याने २०१८ मध्ये १८ षटकार ठोकले. याव्यतिरिक्त, लिनने आपल्या कारकीर्दीत ६३ षटकार लगावले आहेत. ख्रिस लिनची खेळण्याची शैली पाहता तो आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकू शकतो.
३. डेव्हिड वॉर्नर (David Warner)
सन २०१९ मध्ये आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी केली होती आणि १२ सामन्यांत ६९२ धावा केल्यावर त्याला ऑरेंज कॅप देखील मिळाली होती. त्याशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीतही डेव्हिड वॉर्नरचा पहिला क्रमांक आहे.
आयपीएल कारकीर्दीत त्याने आतापर्यंत १२६ सामन्यात १४२.३९ च्या स्ट्राइक रेटने ४७०६ धावा केल्या आहेत. ज्यात ४ शतके आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याने १८१ षटकार आणि ४५८ चौकार ठोकले आहेत.
डेव्हिड वॉर्नरने आयपीएल २०१९ मध्ये २१ षटकार ठोकले. त्याचा शानदार फॉर्म पाहता तो २०२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकू शकतो.
४.केएल राहुल (KL Rahul)
इलेव्हन पंजाब संघाची सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केएल राहुल बजावत आहे. केएल राहुलने २०१८ च्या हंगामात ५४.९१ च्या सरासरीने ६५९ धावा केल्या, तर २०१९ च्या मोसमात त्याने ५३.९० च्या सरासरीने एकूण ५९३ धावा केल्या.
जेव्हापासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारताच्या या युवा फलंदाजाला किंग्ज इलेव्हन पंजाबची नेतृत्वाची जबाबदारी मिळाली तेव्हापासून केएल राहुलची कामगिरी सुधारली आहे. अलीकडेच राहुलने भारतासाठीही खूप चांगली कामगिरी केली आहे.
त्याने मागील मोसमात एकूण २५ षटकार ठोकले. गेल्या मोसमात सर्वाधिक षटकार मरणाऱ्यांमध्ये राहुल सहाव्या क्रमांकावर होता. आयपीएल कारकिर्दीत त्याने ६७ सामन्यांत ८१ षटकार ठोकले आहेत.
५. आंद्रे रसेल (Andre Russell)
आयपीएल २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या कामगिरीने इतर सर्व संघांना धडकी भरली होती. स्वतःच्या जोरावर पाच सामन्यात विजय मिळवून देणार्या रसेलने २० सामन्यात २०४.८१ च्या स्ट्राइक रेटने एकूण ५१० धावा केल्या आणि तो गेल्या मोसमात सर्वोच्च ५२ षटकार ठोकणारा फलंदाजही होता.
मागील हंगामात, फलंदाजाने १४ सामन्यांत २०४.८१ च्या स्ट्राईक रेटने एकूण ५१० धावा फटकावल्या तर गोलंदाजीत त्याने ११ बळीही घेतले. याशिवाय आयपीएल कारकीर्दीत त्याने ६४ सामन्यांत एकूण १४०० धावा केल्या आहेत, ज्यात १२० षटकारांचा समावेश आहे.
मागील सत्रात रसेलने ५२ षटकार ठोकले होते आणि सर्वाधिक षटकार ठोकण्यात तो अव्वल होते. रसेलच्या उत्कृष्ट कामगिरीकडे पाहता तो आयपीएल २०२० मध्येही सर्वाधिक षटकार मारू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत
महत्त्वाच्या बातम्या –
६ वर्षांपासून आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या पुजाराच्या नावावर आहे हा मोठा विक्रम; विराट- रोहितही आहेत मागे
दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल