---Advertisement---

ब्रेकिंग- ठरलं तर! आयपीएल २०२० होणार, ती देखील या देशात

On: मंगळवार, जुलै 21, 2020 7:09 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) १३ वा मोसम भारतातून हलवून संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आयोजित केला जाणार आहे. याबद्दल आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पटेल यांनी सांगितले की आयपीएल २०२० चा मोसम यूएईला होईल. पण याबद्दल अधिकृत घोषणा पुढील बैठकीच्यावेळी केली जाईल. मात्र पटेल यांनी या मोसमासाठीच्या कालावधीबद्दल कोणतीही पुष्टी केली नाही.

परंतु बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान आयपीएलचा हा मोसम आयोजित करु शकतात. कारण आता आयसीसीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी२० विश्वचषकही पुढे ढकलला आहे.

याबरोबरच पटेल यांनी सांगितले की “आम्ही आयपीएल बाहेर आयोजित करण्याच्या परवानगीसाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे. ती परवानगी मिळायला हवी.”

पटेल यांनी स्पर्धेसाठी दुबई, अबू धाबी आणि शारजाह हे तीन मुख्य ठिकाणे असतील असेही सांगितले. तसेच स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेण्याच्या निर्णयाबद्दल पटेल यांनी सांगितले की हे यूएई सरकारवर अवलंबून असेल.

आयपीएलचा हा मोसम याआधी एप्रिल-मेमध्ये होणार होता. परंतू कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता.

पण अजून बीसीसीआयने आयपीएल २०२० यूएईला हलवण्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

ट्रेंडिंग घडामोडी – 

शतकाचा आनंदच इतका झाला की चक्क मैदानावरील पंचांनाच मारली होती धडक; सोशल मीडियावर पडला मिम्सचा पाऊस

गोलंदाजी करत असताना अचानक बेन स्टोक्स सीमारेषेकडे धावला आणि…

या पाकिस्तानी खेळाडूचा सलग चौथ्यांदा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह; प्रशिक्षक मिस्बाह म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---