---Advertisement---

कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश

---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून दारुण पराभव केला. या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 4 षटकांत 8 धावा देऊन 3 गडी बाद केले. त्याने दोन षटके निर्धाव फेकत विक्रमही नोंदवला. या सामन्याआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने त्याला मिया म्हणून संबोधले होते आणि नवीन चेंडूने गोलंदाजी करण्यास तयार रहा, असा संदेशही दिला होता.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहम्मद सिराजने कर्णधार विराट कोहलीचे आभार मानले. तो म्हणाला की, “मला नवीन चेंडूने गोलंदाजी दिल्याबद्दल मी विराट भैय्याचे आभार मानतो. खेळपट्टी न पाहिल्यामुळे चेंडू स्विंग होईल का याची खात्री नव्हती. मी नवीन चेंडूने गोलंदाजी करीन अशी आमची योजना नव्हती. परंतु जेव्हा आम्ही मैदानावर पोहोचलो, तेव्हा विराट भाई मला म्हणाला ‘मिया तयार राहा, तुला नवीन चेंडूने गोलंदाजी करायची आहे’. मी त्याला ठीक आहे असे सांगितले. सराव सत्रात मी नवीन चेंडूने गोलंदाजी केली होती, त्यामुळे मला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला होता.”

https://twitter.com/RCBTweets/status/1319090156846997504?s=19

आरसीबीच्या गोलंदाजी विभागाबद्दल बोलताना सिराज म्हणाला की, “मागील सामन्यात विजय मिळाल्यामुळे या सामन्यासाठी संघाची फक्त एकच योजना होती. शेवटच्या सामन्यात अनुभवी एबी डिविलिअर्सने चांगली कामगिरी केल्यामुळे संघात आत्मविश्वास वाढला होता. वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसच्या आगमनाने आमच्या गोलंदाजीत खूप मदत झाली आहे.फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करत होता. मलाही गोलंदाजी करताना खूप मजा आली. नितीश राणाला रणनीतीनुसारच बाद केले.”

मोहम्मद सिराजने चार षटकांत आठ धावा देऊन तीन गडी बाद केले. सुरुवातीला त्याने सलग दोन षटके निर्धाव फेकली. केकेआरच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. कर्णधार ओएन मॉर्गनने सर्वाधिक 30 धावा केल्या. त्यांच्यानंतर फलंदाज लॉकी फर्ग्युसनने नाबाद 19 धावा केल्या. केकेआरने 20 षटकात केवळ 84 धावा केल्या आणि आरसीबीला 85 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान आरसीबीने 14 व्या षटकातच पूर्ण केल.

आयपीएलमधील ही तिसरी घटना होती, ज्यामध्ये केकेआरला तीन अंकी धावसंख्या गाठता आलेली नाही. ही त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. 2008 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाने केवळ 67 धावा केल्या होत्या.

केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत असल्यामुळे केकेआरचे फलंदाज लवकर बाद झाले. ओएन मॉर्गनचा निर्णय चुकीचा ठरवण्यात आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनी कसलाही कसर सोडली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

“गौतम गंभीरला कोलकाताचा प्रशिक्षक करा”, आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर ट्विटरवर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

केवळ एक-दोन नाही तर चक्क चार षटकं निर्धाव टाकत बेंगलोरने केला अनोखा पराक्रम

Video : आयपीएलमधून बाहेर पडलेल्या ड्वेन ब्राव्होचा चेन्नईच्या चाहत्यांसाठी भावूक संदेश, म्हणाला…

ट्रेंडिंग लेख – 

आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज

आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज

आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---