इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलला सुरुवात होऊन आतापर्यंत १२ वर्षे झाली आहेत. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरता आलेले नाही. आरसीबी संघ प्रत्येक हंगामात स्टार खेळाडूंसोबत मैदानावर उतरतो. परंतु त्यांना यश मात्र मिळत नाही. आता संघासोबत बऱ्याच वर्षांपासून असणारा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने संघाच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.
शेवटच्या षटकात गमावतात ३० टक्के सामना
आरसीबी संघाला एकही आयपीएलचे विजेतेपद जिंकता न आल्यामुळे नेहमी विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. परंतु आता चहलने आकाश चोप्रासोबत चर्चा करताना म्हटले की, आरसीबी संघ आपला ३० टक्के सामना हा सामन्याच्या शेवटच्या षटकातच गमावतो.
चहलने लाईव्ह चॅटमध्ये बोलताना म्हटले की, “मी आरसीबी संघासोबत ६ वर्षांपासून खेळत आहे. जेव्हा आमच्याकडे मिचेल स्टार्क होता, ते वर्ष सोडले, तर आमची सर्वात मोठी समस्या ही शेवटच्या षटकातील गोलंदाजी राहिली आहेत. आम्ही १६-१७ व्या षटकांपर्यंत विरोधी संघाच्या फलंदाजांना घाम फोडण्यात यशस्वी राहिलो आहोत. परंतु आम्ही ३० टक्के सामने शेवटच्या ३ षटकांमुळे गमावतो.”
गोलंदाजीबाबत यावर्षी अनेक पर्याय
आयपीएल २०२० च्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. आरसीबी संघात येत्या हंगामात चहलव्यतिरिक्त गोलंदाज म्हणून नवदीप सैनी, डेल स्टेन, ख्रिस मॉरिस आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.
चहल म्हणाला, “यावर्षी आमच्याकडे शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी अनेक पर्याय असणार आहेत. कारण पहिल्या १६ षटकांनंतर गरज पडल्यास मी १७ वे षटक टाकत होतो. नाहीतर आमच्याकडे शेवटच्या ४ षटकांसाठी केवळ २ गोलंदाजांचा पर्याय असायचा. परंतु आता आमच्याकडे ३-४ गोलंदाजांचा पर्याय असेल. आधी आमच्या संघात केवळ याच गोष्टीची कमतरता होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल खेळण्यासाठी जाण्यापूर्वी भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने उरकून घेतला साखरपुडा
-‘तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी इकॉनॉमीमध्ये बसेल,’ धोनीचा दिलदारपणा; स्टाफ मेंबरला आपली सीट केली ऑफर
-सचिन-गावसकरांपाठोपाठ या क्रिकेटरचे नावही झळकणार वानखेडेच्या ब्लाॅकला
ट्रेंडिंग लेख-
-निवृत्तीनंतर आता या ५ क्षेत्रात दिसू शकतो एमएस धोनी
-भारतीय संघासाठी या ३ टी-२० सामन्यात सुरेश रैनाने होता कर्णधार
-लाईनीत उभं करत आपल्याच संघातील खेळाडूंची झाडाझडती घेणारा जंलटमन क्रिकेटर