आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. आयपीएलच्या या दुसऱ्या टप्प्यात सर्वात जास्त अडचणी राजस्थान राॅयल्स संघासमोर येऊ शकतात. कारण त्यांच्या संघातील बरेच खेळाडू दुखापतीमुळे आणि काही अन्य कारणांमूळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. अशात संघासाठी इंग्लिश खेळाडू लियाम लिविंगस्टोन याला महत्व प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर संघासाठी चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी आली आहे. राजस्थान राॅयल्सचे पहिल्या टप्प्यातील प्रदर्शन काही चांगले राहिले नव्हते, अशात दुसऱ्या टप्प्यात संघ काही कमाल करू शकतो का? हे पाहावे लागेल.
संघासाठी महत्वाचे असणारे विदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीत लियाम लिविंगस्टोन संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल अशी आशा बाळगली जात आहे. त्यामुळे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा सहभाग निश्चित मानला जात आहे आणि तो या संधीचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न करेल. यामागे काही प्रमुख कारणेही आहेत. आपण त्याच काही करणांवर नजर टाकणार आहोत.
मोठे फटके मारण्याची क्षमता
बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्या गैरहजेरीत लिविंगस्टोनवर संघाच्या फलंदाजीची धुरा अवलंबून असेल. तो संघासाठी मोठी फटकेबाजी करत विस्फोटक खेळी करु शकतो आणि हे त्याने पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेत दाखवले आहे. यूएईच्या मोठ्या मैदानावर अशाच मोठ्या हिटची संघाला गरज आहे. लिविंगस्टोन फलंदाजीदरम्यान गोलंदाजांना कसलीही संधी देणार नाही. तो त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर संघास स्पर्धेत पुढे घेऊन जाऊ शकतो.
संघासाठी फिरकी गोलंदाजी करू शकतो
गोलंदाजीमध्येही लिविंगस्टोन संघासाठी महत्वाची कामगिरी करू शकतो. तो जास्त गोलंदाजी करत नाही, तरीदेखील तो संघासाठी गोलंदाजी पर्याय ठरू शकतो. यूएईमध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळते आणि अशात लिविंगस्टोन राजस्थान संघासाठी गोलंदाजीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडू शकतो.
लिविंस्टोनचा उत्तम फाॅर्म
लिविंगस्टोन सध्या त्याच्या चांगल्या फाॅर्ममध्ये आहे आणि ही गोष्ट संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान राॅयल्ससाठी एक प्लस पाॅइंट ठरू शकते. पाकिस्तान विरुद्ध मायदेशातील टी२० मालिकेतील ३ सामन्यात त्याने १४७ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तो अशाच चांगल्या फार्ममध्ये दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या फलंदाजांच्या पहिल्या टप्प्यातील ३ ‘ब्लॉकब्लास्टर खेळी’, पडीक्कलचे नाबाद शतकही आहे यादीत
असे ३ गोलंदाज, जे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात घेऊ शकतात सर्वाधिक विकेट्स; २ भारतीयांचा समावेश