आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. सोबतच कर्णधार एमएस धोनीलाही दमदार खेळी करता आली नाही. त्यामुळे पुढील आयपीएल हंगामात मेगा लिलावापूर्वी चेन्नई संघाने धोनीला रिटेन नाही केले पाहिजे, असा सल्ला माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने दिला आहे. यावेळी त्याने सल्ला देत त्यामागील कारणही सांगितले आहे.
चोप्राने कारण सांगत म्हटले की, जर चेन्नईने धोनीला कायम केले, तर त्यांचे १५ कोटी रुपयांचे नुकसान होईल. तो पुढे म्हणाला की, चेन्नईने धोनीला लिलावात सोडले पाहिजे आणि यानंतर त्याला राईट टू मॅच कार्डमार्फत संघात सामील केले पाहिजे. असे केल्याने चेन्नईचे पैसेही वाचू शकतात आणि चांगला संघही तयार होऊ शकतो.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत चोप्राने म्हटले, “मला वाटते की, चेन्नईने धोनीला रिलीझ केले पाहिजे. जेणेकरून तो मेगा लिलावात येऊ शकेल. जर मेगा लिलाव झाला, तर तुम्ही ३ वर्षांपर्यंत त्या खेळाडूसोबत राहाल. परंतु धोनी तुमच्यासोबत ३ वर्षे राहु शकतो का? मी असे म्हणत नाही की, धोनीला संघात ठेवले नाही पाहिजे. तो पुढील आयपीएल हंगाम खेळेल, परंतु जर तुम्ही त्याला रिटेन खेळाडूप्रमाणे ठेवत असाल, तर तुम्हाला १५ कोटी रुपये द्यावे लागतील.”
If it’s a big auction before #IPL2021, can #CSK afford to retain anyone? Perhaps, letting everyone go and then use RTM to acquire some players again be prudent. Here’s my take in today’s #AakashVani https://t.co/gv80LggqIk
— Aakash Chopra (@cricketaakash) November 17, 2020
“जर पुढील ३ वर्षांसाठी धोनी तुमच्यासोबत नसेल आणि केवळ २०२१ चा हंगाम खेळणार असेल, तर तुम्ही २०२२ च्या हंगामात १५ कोटी रुपये परत घेऊ शकता. परंतु तुम्ही १५ कोटी रुपयांच्या किमतीचा खेळाडू कोठून आणणार? मेगा लिलावाचा हाच फायदा आहे. जर तुमच्याकडे पैसे आहेत, तर तुम्ही एक मोठा संघ बनवू शकता. जर तुम्ही धोनीला मेगा लिलावासाठी रिलीझ केले, तर तुम्ही त्याला राईट टू मॅच कार्डमार्फत निवडू शकता. सोबतच तुम्ही आपल्या इच्छेनुसार पैसे देऊन योग्य खेळाडूची निवड करू शकता,” असे पुढे बोलताना तो म्हणाला.
“तुम्ही धोनीला लिलावातही घेऊ शकता. जर चेन्नईच्या फायद्यासाठी पाहायचं झालं, तर धोनीला रिलीझ करून लिलावात घेणे सर्वात जास्त फायद्याचे ठरेल,” असेही चोप्रा म्हणाला.
आयपीएल २०२०मध्ये चेन्नई संघाने १४ सामने खेळले. यात त्यांना केवळ ६ सामन्यात विजय मिळवता आला, तर उर्वरित ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ते या हंगामात १२ गुणांसह सातव्या क्रमांकावर होते. आयपीएल इतिहासात चेन्नई संघाला पहिल्यांदाच प्ले- ऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ क्रिकेटपटू टीम इंडियात घेऊ शकतो एमएस धोनीची जागा
…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!
आनंदाची बातमी! ‘या’ छोट्या शहरात सुरु होतेय एमएस धोनीची क्रिकेट अकॅडेमी
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…