इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच रोमांचक वळणावर आली होती. मालिकेती पाचवा सामना शुक्रवारी (१० सप्टेंबर) सुरू होणार होता, पण भारतीय संघाच्या बायो बबलमध्ये कोरोना विषाणूच्या शिरकावानंतर हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मालिकेत सहभागी असलेल्या आपल्या संघातील खेळाडूंना परत आणण्यासाठी आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स तयारी करत आहे.
या मालिकेमध्ये खेळलेल्या रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, चेतेश्वर पुजारा, मोईन अली आणि सॅम करन हे खेळाडूंचा सीएसकेच्या संघात सामावेश आहे. या गोष्टीची माहिती सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिली आहे. आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून यूएईतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी पीटीआयशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. “चार्टर्ड विमानाची आता शक्यता नाहीये. आम्ही प्रयत्न करत आहोत की, उद्या व्यावसायिक विमानाचे तिकिट निघतील. जेव्हा ते येथे पोहोचतील, तेव्हा बाकीच्या खेळाडूंप्रमाणे सहा दिवसांपर्यंत विलगीकरणात राहतील.”
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात कोविड-१९ विषाणू आढळण्याच्या आधी ठरले होते की, चेन्नई आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या दोन्ही संघातील खेळाडूंना एकत्र चार्टर्ड विमानाने यूएईमध्ये आणले जाणार होते. हे खेळाडू इंग्लंड दौऱ्याच्या बायो बबलमधून थेट यूएईमध्ये संघाच्या बायो बबलमध्ये सहभागी होणार होते. मात्र आता या नियोजित कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय संघाच्या खेळाडूंनी सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य कोरोना संक्रमित सापडल्यानंतर ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटीत खेळण्यासाठी नकार दिला आहे. यानंतर पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी (९ सप्टेंबर) भारतीय संघाचे फिजियो योगेश परमार कोरोना संक्रमीत असल्याचे समोर आले होते. यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना हाॅटेल रूममध्येच राहण्यास सांगितले गेले होते. यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ओव्हलवरील चौथ्या कसोटी सामन्याआधी कोरोना संक्रमीत सापडले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
इकडे आड तिकडे विहीर! रवींद्र जडेजा फसला मोठ्या पेचात, जाणून घ्या काय आहे प्रकरण
अंतिम सामन्यात पराभूत होऊनही बांगलादेशचा मोठा कारनामा; न्यूझीलंडविरुद्ध जिंकली ऐतिहासिक मालिका
इंग्लंड-भारत संघातील पाचवा कसोटी तर रद्द, पण कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेवर झाला का परिणाम?