आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती. चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच तेराव्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी राहिला होता. त्यामुळे यंदा होणार्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाची नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे. यामुळे चेन्नई संघ लिलावाआधी 7ते8 खेळाडूंना करारातून मुक्त करण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी एक सर्वात मोठी समस्या आहे. त्यांच्याकडे फक्त 15 लाख रुपये शिल्लक आहे. त्यामधून त्यांना नवीन खेळाडूंची खरेदी करावी लागणार आहे. याबद्दल आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसीलने यापूर्वी घोषणा केली आहे की, आयपीएल 2021 मध्ये मोठा लिलाव होणार नाही. त्यामुळे ज्या संघाकडे जेवढे पैसे आहेत. त्यामधूनच त्यांना नवीन खेळाडू खरेदी करावे लागतील. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला सध्या संघात असलेल्या मोठ्या खेळाडूंना करारातून मुक्त करून नवीन खेळाडू खरेदी करावे लागतील.
इनसाइडस्पोर्टच्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्ज 35 वर्षीय केदार जाधवला करारातून मुक्त करणार आहे. ज्याला 7.8 कोटी रुपये मिळतात. त्याच्या शिवाय हरभजन सिंग, इम्रान ताहीर, जोश हेझलवूड, मुरली विजय, पियुष चावला, कर्ण शर्मा, ड्वेन ब्राव्हो यांना करातून मुक्त करू शकते. आयपीएल स्पर्धेतील संघ 21 जानेवारी पर्यंत खेळाडूंना मुक्त करू शकतात आणि त्यांच्या जागी दुसर्या संघातील खेळाडू बदलून घेवू शकतात.
या खेळाडूंना दिले जाते एवढे मानधन
केदार जाधव 7.8 कोटी, इम्रान ताहीर 1 कोटी, पियुष चावला 6.75 कोटी, हरभजन सिंग 2 कोटी, मुरली विजय 2 कोटी, ड्वेन ब्राव्हो 6.4 कोटी, जोश हेझलवूड 2 कोटी आणि कर्ण शर्मा 5 कोटी.
या खेळाडूंना करारातून मुक्त केल्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे लिलावासाठी 33 कोटी रुपये उपलब्ध असतील. ज्यामधून नवीन खेळाडू खरेदी करता येवू शकतात. या व्यतिरिक्त 4 कोटी रुपये असतील, जे त्यांना शेन वॉटसन निवृत्त झाल्यामुळे मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके
‘मैदानावर टिकायचं म्हणून तो चेंडू टोलवताना घाबरत होता’, ऑस्ट्रेलियन दिग्गजांची पुजारावर सडकून टीका