आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. भारतात आयोजित केलेला हा आयपीएलचा १४ वा हंगाम संघातील काही खेळाडूंना कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे अर्ध्यातच स्थगित करावा लागला होता. त्यानंतर आता या हंगामातील उर्वरित सामने यूएईत खेळवले जाणार आहेत. यासाठी संघ यूएईला रवाना होऊ लागले आहेत.
महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्सचा संघ सर्वप्रथम यूएईत दाखल झाला आहे. अशातच आता चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने आयपीएल २०२१ मध्ये त्यांच्या संघाला आणखीन मजबूत करण्यासाठी युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला संघात राखीव गोलंदाजाच्या रूपात सामील केले असल्याची चर्चा आहे.
Tushar Deshpande is one of the reserve player/net bowler for Chennai Super Kings in the IPL 2021 at UAE.
— Johns. (@CricCrazyJohns) August 14, 2021
याआधी तुषार यूएईतच झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामामध्ये खेळलेला आहे. तो त्यावेळी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळत होता. त्याने दिल्लीच्या संघासाठी १३ व्या हंगामात ५ सामने खेळले होते. खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याला केवळ ३ विकेट मिळवता आल्या होत्या. त्यावेळी तुषारची इकोनॉमी ११.२५ होती.
तुषार देशपांडे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकला नसला तरीही त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली खेळी केली आहे. त्याच्या आकड्यांचा विचार केला तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत ५० विकेट मिळवल्या आहेत. त्यव्यतिरिक्त त्याने लिस्ट ए सामन्यांत २६ विकेट घतलेल्या आहेत.
तर चेन्नईचा संघ या हंगामात चांगले प्रदर्शन करत आहे. स्पर्धेला स्थगिती मिळेपर्यंत या संघाने ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत १० गुण मिळवले असून दुसऱ्या स्थानावर आहे. अशात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आणि चेन्नई संघासोबत तुषार देशपांडे काय कमाल करणार? हे आता पाहण्यासारखे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या ‘या’ भारतीयाचे टी२० विश्वचषकातील स्थान अनिश्चित, भिडूपासूनच आहे धोका!
‘हिटमॅन’ देतोय विराटच्या साम्राज्याला आव्हान! हेडिंग्ले कसोटी ठरणार महत्वपूर्ण?
‘या’ दिवशी युएईसाठी उड्डाण भरणार दिल्ली कॅपिटल्सचा ताफा, पण कर्णधाराचा निर्णय गुलदस्त्यात