---Advertisement---

आधी कर्णधारपद गेलं, मग संघातील स्थानही; उर्वरित आयपीएल हंगामात खेळणार का वॉर्नर? घ्या जाणून

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 10:26 PM
David Warner
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्यासाठी आयपीएल 2021 चा पहिला टप्पा विसरण्याजोगा राहिला. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने विशेष प्रदर्शन न केल्याने त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्याजागी न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विलियम्सनच्या ही जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर पुढील सामन्यात त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्येही जागा मिळाली नाही. अशात आयपीएलच्या राहिलेल्या सामन्यांमध्ये तो खेळेल की नाही? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. आता स्वत: वॉर्नरने यासंदर्भात संकेत दिले आहेत.

वॉर्नरने आयपीएल 2021 च्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात भाग घेईल की नाही, यासंदर्भात त्याने सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टद्वारे पुष्टी केली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या माजी कर्णधाराने कोणतेही वक्तव्य जारी केले नसून संघाची जर्सी घातलेला एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी परत येईन.’ यावरुन स्पष्ट होते की, वॉर्नर आयपीएलच्या उर्वरित हंगामात खेळणार आहे.

https://www.instagram.com/p/CSY6aMIJTSN/?utm_source=ig_web_button_share_sheet

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा भारतात हंगामाचा पहिला टप्पा खेळला गेला. तेव्हा संघातील काही खेळाडू कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यामुळे 29 सामन्यानंतर आयपीएलला स्थगिती देण्यात आली. पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने 7 सामने खेळले आहेत. परंतू, त्यांना केवळ एक सामना जिंकता आला आहे. परिणामी सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

दरम्यान डेव्हिड वॉर्नरने सहा सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने एकूण 193 धावा केल्या आहेत. कारण त्याचा स्ट्राइक रेट 110.28 इतका राहिला आहे, जो त्याच्या चाहत्यांना फारसा आवडला नाही. कारण, तो सलामीवीर फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याकडून अजून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. त्याने 6 सामन्यात फक्त 15 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. आता तो युएईमध्ये होणाऱ्या उर्वरित हंगामात त्याच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी जोरदार पुनरागमन करू इच्छित असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

मयंक भाऊ परतले, सरावालाही लागले; पण लॉर्ड्स कसोटीत मिळेल का सलामीला संधी?

‘मिशन ऑस्ट्रेलिया’ फत्ते करण्यासाठी भारतीय संघाची तयारी सुरू, ‘या’ दिवशीपासून करणार सराव

“एकट्या शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियाच्या आख्ख्या संघापेक्षा जास्त धावा केल्या”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---