आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. यामध्ये केकेआरने केवळ ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि अवघ्या १६ व्या षटकात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. सामन्यादरम्यान केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवविषयी एक खंत व्यक्त केली आहे.
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वातील केकेआर संघासोबत आयपीएलमध्ये खेळला आहे. गंभीरच्या नेतृत्वात केकेआर संघाने २ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. गंभीरच्या नेतृत्वात सर्वाधिक वेळा त्याला संघाच्या फिनिशरच्या रूपात संधी मिळाली होती. मात्र, जेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला लागला आहे, तेव्हापासून त्याच्या खेळीमध्ये जबरदस्त बदल झालेला दिसतो. यानंतर आता गौतम गंभीरने त्याला कधी तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली नाही, यासाठी खंत व्यक्त केली आहे.
गंभीरने सूर्यकुमारबदद्ल बोलताना सांगितले की, “तो मुंबई इंडियन्स आणि भारतासाठी खेळाच्या सर्वात छोट्या प्रारूपामध्ये संघाचा मुख्य आधार बनला आहे. सूर्यकुमारने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना मागच्या तीन हंगामांमध्ये ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.”
गंभीर म्हणाला की, “मला फक्त या गोष्टीचा पश्चाताप आहे की, मी सूर्यकुमारला तिसऱ्या स्थानावर खेळवले नाही. मनीफ पांडे आणि युसूफ पठाणसारखे खेळाडू होते, त्यामुळे आम्हाला त्याला नेहमी फिनिशरच्या रूपात वापरावे लागले. खूप खेळाडू एका फ्रेंचायझीमधून दुसऱ्या फ्रेंचायझीमध्ये जातात.”
तो पुढे म्हणाला, “तो ज्याला आम्ही चार वर्षांपर्यंत तयार केले आणि नंतर जाऊ दिले आणि आता तो त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम फाॅर्ममध्ये आहे, कारण आम्ही त्याला ते स्थान (३ क्रमांक) देऊ शकलो नाहीत.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर, मुंबईचा मार्गही खडतर; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती
VIDEO: वेंकटेशनने कृणालला दाखवला आरसा, विना हेल्मेट फलंदाजी करत ठोकला ‘निर्भीड’ सिक्स
आरसीबीची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतमबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? वाचा सविस्तर