---Advertisement---

‘हा’ संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर, मुंबईचा मार्गही खडतर; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 12:08 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात क्रिकेट चाहत्यांना अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. असाच एक रोमांचक सामना गुरुवारी (२३ सप्टेंबर) देखील पाहायला मिळाला. या सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्स संघ आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवत आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सलग दुसऱ्या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. चला तर पाहूया, कशी आहे गुणतालिकेची सद्यस्थिती.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने गाठले चौथे स्थान 
ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला आतापर्यंतच्या ९ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे.

तर मुंबई इंडियन्स संघाच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. मुंबई इंडियन्स संघ देखील ८ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. परंतु त्यांचा रनरेट -०.३१० असा आहे. जर मुंबई इंडियन्स संघाला आणखी २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर, हा संघ प्लेऑफमधून बाहेर होऊ शकतो.

हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर
आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद संघ सर्वात खालच्या स्थानी आहे. या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांनी आतपर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे तर अवघ्या १ सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. जर सनरायझर्स हैदराबाद संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना पुढील ६ सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

तसेच पंजाब किंग्स संघाचे देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे. या संघाला ९ सामन्यांपैकी अवघ्या ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. सध्या हा संघ ७ व्या स्थानी आहे. तर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागेल.

हे संघ आहेत टॉप-४ मध्ये
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ ६ सामने जिंकून १२ गुणांसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी आणि मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करत कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८ गुणांसह चौथे स्थान गाठले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

VUDEO: वेंकटेशनने कृणालला दाखवला आरसा, विना हेल्मेट फलंदाजी करत ठोकला ‘निर्भीड’ सिक्स

आरसीबीची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतमबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? वाचा सविस्तर

‘गुलिगत धोका’! रोहितची विकेट काढत नरेनची मातब्बर गोलंदाजांशी बरोबरी, नोंदवला खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---