आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई इंडियन्सचे हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधू हे दोघे भाऊ यूएईत पोहोचले आहेत. मुंबई संघातील काही खेळाडू १३ ऑगस्टला यूएईत दाखल झाले असून आता हे दोघे देखील संघासोबत सामील झाले आहेत. यूएईमध्ये आयपीएल २०२१च्या उर्वरीत सामन्यांची १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये होणार आहे. दरम्यान पंड्या बंधूंनी यूएईमध्ये पोहोचताच यावर्षीचा आयपीएलचा हंगाम जिंकण्याविषयी भाष्य केले आहे.
आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळणारे पंड्या बंधू भारताच्या नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात होते. या टी२० मालिकेदरम्यान कृणाल पंड्याला कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्याला झालेल्या कोरोनाच्या संक्रमणानंतर दोघाभावांसोबत भारतीय संघातील ८ खेळाडूंना विलगीकरणात ठेवले होते.
आयपीएल २०२१ हंगामातील उर्वरित सामने खेळण्यासाठी यूएईत पोहोचताच हार्दिक पंड्या म्हणाला, “आम्हाला खूप चांगल वाटत आहे आणि माहित आहे की मागच्या वर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा सर्व गोष्टींच पालन करायचं आहे. आम्ही एका चांगल्या हंगामाची आणि विजयाची आशा करत आहेत. आशा नाही, आम्ही सलग तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकणार आणि संघासोबत विश्वचषकही.”
हार्दिक पंड्याचा भाऊ आणि मुंबईचा खेळाडू कृणाल पंड्यानेही यूएईत पोहोचताच म्हटेले आहे की, ‘मागच्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या हंगामाच्या खूप आठवणी आमच्याकडे आहेत. आम्ही विजेते बनलो होतो आणि शक्यतो त्यामुळेच आम्हला आणखी चांगल वाटत होत. आता चौदाव्या हंगामातील दुसरे पर्व सुरू होत आहे. आणि सलग तिसरे विजेतेपद आमच्या नावावर करण्याच्या इराद्याने खेळू.’
𝑨𝒍𝒍 𝒔𝒎𝒊𝒍𝒆𝒔 𝒊𝒏 𝒒𝒖𝒂𝒓𝒂𝒏𝒕𝒊𝒏𝒆 ✌️😄#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @hardikpandya7 @krunalpandya24 pic.twitter.com/cGbrIU5aQd
— Mumbai Indians (@mipaltan) August 27, 2021
आयपीएलच्या भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये पंड्या बंधूंना चांगली सुरुवात करता आली नाही. हार्दिक त्याच्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर मुंबई इंडियन्ससाठी एकही चेंडू टाकलेला नाही आणि फलंदाजीमध्ये ७ सामन्यात त्याने केवळ ८.६६ च्या सरासरीने ५२ धावा केल्या आहेत. तसेच कृणालने फलंदाजीमध्ये केवळ ३९ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत केवळ ३ विकेट मिळवता आल्या आहेत.
उर्वरित सामन्यांना सरुवात झाल्यावर मुंबईचे हे दोन खेळाडू चांगल्या खेळाचे प्रदर्शन करतील, अशी चाहत्यांची इच्छा आहे. आयपीएलचा यावर्षीचा १४ वा हंगाम भारतात आयोजित केला गेला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि खेळाडू बायोबबलमध्ये असूनही त्यांना कोरोनाची संक्रमण झाले. त्यानंतर बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर या हंगामातील राहिलेले सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केविन पीटरसनला भविष्यवाणी पडली महागात, वसीम जाफरने घेतली ‘अशी’ फिरकी
सीएसकेच्या प्रशिक्षण सत्रात धोनी दिसला नव्या भूमिकेत, दीपक चाहरने जिंकला मजेदार गेम
माजी कर्णधार बनणार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष? पंतप्रधान घेणार अंतिम निर्णय