---Advertisement---

वडिलांच्या निधनांतरही खेळली होती आयपीएल, मुंबईविरुद्ध ‘या’ धाकड फलंदाजाला आजमावणार पंजाब?

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 4:45 PM
---Advertisement---

कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केल्यानंतर पुढील ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पंजाब संघातील मुख्य फलंदाजांना या सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयश आले आहे.

दीपक हुड्डा आणि मयंक अगरवाल यांना एकाच सामन्यात चांगली कामगिरी करता आली होती. त्यांनतर हे दोघेही फ्लॉप ठरले होते. तसेच शाहरुख खान अधूनमधून मोठमोठी फटकेबाजी करत आहे. तरी देखील या संघाला जास्त धावा करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आज (२३ एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात राहुलला संघात मोठे बदल करावे लागतील. या संघात असा एक खेळाडू आहे, ज्याला संधी मिळाल्यास तो संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो. हा खेळाडू म्हणजे, मनदीप सिंग.

गतवर्षी कोरोना असल्याकारणाने आयपीएल २०२० हंगाम युएईमध्ये खेळवण्यात आले होते. या हंगामात पंजाब संघ ६ व्या क्रमांकावर होता. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेतही त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक सामना हा पंजाब किंग्ज संघासाठी महत्वाचा असणार आहे. अशावेळी पंजाब संघ मनदीप सिंगला संधी देण्याची दाट शक्यता आहे.

मनदीप सिंगने आयपीएल २०२० स्पर्धेत पंजाब संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला जर या हंगामात संधी मिळाली, तर तो पंजाब संघाला मोठ्या धावा उभारण्यात मदत करू शकतो. आयपीएल २०२० स्पर्धा सुरू असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी बायो बबलमध्ये असल्यामुळे त्याने माघारी न जाता संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मनदिपचे वडील ॲथलेक्टिसचे प्रशिक्षक होते.

मनदीप सिंगची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी
मनदीप सिंगने युएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत ७ सामने खेळले होते. यात त्याने २२ च्या सरासरीने १३० धावा केल्या होत्या. यात त्याने नाबाद ६६ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १०४ सामने खेळले आहेत. यात त्याने २२.१२ च्या सरासरीने १६५९ धावा केल्या आहेत. यात त्याने ६ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच नाबाद ७७ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

पंजाब संघाची आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरी
पंजाब किंग्ज संघाने या हंगामाची सुरुवात विजयाने केली होती. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने पंजाब किंग्ज संघावर ६ गडी राखून विजय मिळवला होता. यासोबतच दिल्ली कॅपिटल्स संघाने देखील त्यांना ६ गडी राखून पराभूत केले होते. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्ज संघावर ९ गडी राखून विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई-पंजाबसमोर विजय मार्गावर परतण्याचं आव्हान; ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

लिलावात नाकारलं तरी मॅक्लेनघनचा इमान मुंबईपाशी, संघ अखेरच्या स्थानी राहिल्यास विकणार सर्व साहित्य

‘शिष्य आणि गुरुला एकत्र…’, रवी शास्त्रींनाही पडली पडीक्कल-कोहलीच्या कामगिरीची भुरळ, केलं कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---