रविवारी (२४ एप्रिल) मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सने ३६ धावांनी धूळ चारली. मुंबई इंडियन्सचा हा आयपीएल २०२२ मधील सलग आठवा पराभव असून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या अपेक्षा जवळपास संपल्या आहेत. लखनऊकडून मिळालेल्या परभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ट्वीटरवर मनातील भावना व्यक्त केली आहे. रोहितने ट्वीटमध्ये संघाला समर्थन देण्यासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
रोहितच्या मते चाहत्यांनी संघ एवढे खराब प्रदर्शन करत असतानाही त्याला समर्थन करणे थांबवलेले नाहीय. अधिकृत ट्वीटर खात्यावरून केलेल्या पोस्टमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्ही या हंगामात आमचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दिले नाहीय, पण असे होत असते. अनेक दिग्गज खेळाडू अशा काळातून जातात, पण मला संघ आणि त्यातील वातावरणावर प्रेम आहे. सोबत आमच्या त्या शुभचिंतकांचेही कौतुक करू इच्छितो, ज्यांनी आतापर्यंत या संघाविषयी विश्वास आणि निष्ठा दाखवली आहे.”
We haven’t put our best foot forward in this tournament but that happens,many sporting giants have gone through this phase but I love this team and it’s environment. Also want to appreciate our well wishers who’ve shown faith and undying loyalty to this team so far 💙@mipaltan
— Rohit Sharma (@ImRo45) April 25, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यातील रविवारचा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने विजय मिळवला. राहुलने ६२ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा फटकावल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स जेव्हा फलंदाजीसाठी आला, त्यांचा सलामीवीर इशान किशन अवघ्या ८ धावा करून बाद झाला. रोहित शर्माने ३९ तर मध्यक्रमातील तिलक वर्माने ३८ धावांचे सर्वश्रेष्ठ योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या एकही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. परिणामी संघ ३६ धावांनी पराभूत झाला. मुंबईने मर्यादित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा केल्या. मुंबई इंडियन्सला त्यांचा पुढचा सामना आता ३० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्ससोबत खेळायचा आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सीएसकेचा परदेशी शिलेदार चढला बोहल्यावर, प्रेयसीशी बांधली लग्नगाठ; PHOTO व्हायरल
बुलेटच्या वेगाने आला चेंडू, तरीही १५ यार्डच्या आत रोहितचा खतरनाक कॅच; पाहून फलंदाजही अचंबित
क्रिकेटर नसता, तर कोण झाला असता जोस बटलर? आर अश्विनला दिले ‘हे’ उत्तर