इंडियन प्रीमियर लीग २०२२चे बिगूल वाजले असून आतापर्यंत ६ संघांनी त्यांचा हंगामातील पहिला सामना खेळला आहे. यानंतर आता सोमवारी (२८ मार्च) २ नव्या फ्रँचायझी, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स आमने सामने येणार आहेत. उभय संघांतील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी गुजरात संघातून कर्णधार हार्दिक पंड्या याच्या गोलंदाजीविषयी मोठी माहिती पुढे आली आहे.
हार्दिक (Hardik Pandya) दीर्घ काळापासून फिटनेसच्या समस्येशी लढतो आहे. त्याने २०२१ मधील टी२० विश्वचषकानंतर आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. आता तो दीर्घ काळानंतर लखनऊ संघाविरुद्ध क्रिकेट सामना (LSG vs GT) खेळेल. तत्पूर्वी गुजरात संघाचे मुख्य प्रशिक्षक (Gujrat Titans Head Coach) आशिष नेहराने (Ashish Nehra) अष्टपैलू हार्दिकच्या गोलंदाजीविषयी मोठे (Hardik Pandya Bowling) भाष्य केले आहे.
क्रिकइंफोशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला की, “मी फार पूर्वीपासून सांगत आहे की, मला हार्दिकला फलंदाज म्हणून खेळवायला जास्त आवडेल. जेव्हा मी त्याला बडोद्यातील कँपमध्ये पाहिले होते, तेव्हा तो ८० टक्क्यापर्यंत गोलंदाजी करत होता. ही काही आठवड्यांपूर्वीचीच गोष्ट आहे. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला आणि तेव्हापासून सातत्याने क्रिकेटचा सरान करत आहे.”
हार्दिकने म्हटले होते की सर्वांना सरप्राईज देईल
काही दिवसांपूर्वीच आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना हार्दिकने सांगितले होते की, तो सर्वांना सरप्राईज करेल. त्याच्या या विधानावर बोलताना नेहरा म्हणाला की, “माझ्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट तेव्हाच असेल, जेव्हा हार्दिक १५३ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करेल. तो सध्या १३४-१३५ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्याजवळ भरपूर अनुभव आहे. जर तो गोलंदाजी करू शकत असता, तर तो कोणत्याही संघासाठीही महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला असता.”
गुजरात टायटन्स संघ – हार्दिक पंड्या (कर्णधार), राशिद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झार जोसेफ, प्रदीप सांगवान, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग, वरुण ऍरॉन, बी साई सुदर्शन
महत्त्वाच्या बातम्या-
Video: रातोरात आरसीबीचा ‘हा’ शिलेदार हिरोपासून बनला झिरो! संघाला नेऊन ठेवले पराभवाच्या उंबरठ्यावर
चेन्नईच्या ताफ्यात मोईन अलीची एन्ट्री, धोनीने ‘असे’ केले स्वागत; व्हिडिओ जोरदार व्हायरल
….म्हणून कुलदीप केकेआरपेक्षा दिल्लीसाठी करणार चांगले प्रदर्शन, अक्षर पटेलने सांगितले कारण