कर्नाटकचा अष्टपैलू अभिनव मनोहर सदरांगणी हा खेळाडू त्याची मुळ किंमत २० लाख घेवून आयपीएल लिलावात उतरला होता. परंतु त्याच्यावर जी बोली लागली ती पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अभिनव मनोहर सदारंगानी लिलाव किंमतीवर एकामागून एक बोली सुरू झाली त्याच्यावर तब्बल १३ पट जास्त म्हणजेच २.६० लाख रुपये एवढी बोली लागली आहे. ती विजयी बोली गुजरात टायटन्स संघाने लावली आहे.
अभिनव हा कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू आहे जो मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच तो एक अप्रतिम गोलंदाज देखील आहे. अभिनवने यावर्षी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत कर्नाटककडून पदार्पण केले आणि अवघ्या ४ सामन्यांत आपले कौशल्य दाखवले.
अभिनवने कर्नाटकसाठी ४ टी२० सामन्यात ५४ च्या सरासरीने १६२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही १५० आहे. त्यामध्ये त्याने ११ षटकार आणि ११ चौकार मारले आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटककडून अभिनवने पदार्पण केले. या सामन्यात अभिनवने ७० धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने ६ षटकार आणि २ चौकार लगावले.
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अभिनव मनोहर सदरांगनी याने अवघ्या ९ चेंडूत १९ धावा केल्या. उपांत्य फेरीत त्याने १३ चेंडूत २७ धावा केल्या. तसेच अंतिम फेरीत त्याने ३७ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याच्या संघाने अंतिम सामना गमावला. आयपीएल २०२२ च्या लिलावात त्याला गुजरात टायटन्स संघाने करोडपती बनवले आहे. मात्र, या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व पंजाब किंग्स हे संघ त्याच्यासाठी बोली लावताना दिसले.
आयपीएल २०२२ च्या लिलावाच्या पहिल्या दिवशी गुजरात टायटन्सने काही महत्त्वाच्या खेळाडूंना खरेदी केले. या संघाने मोहम्मद शमीला ६.२५ कोटींमध्ये, जेसन रॉयला २ कोटींमध्ये, लॉकी फर्ग्युसनला १० कोटींमध्ये विकत घेतले. राहुल तेवातियालाही गुजरातने ९ कोटींमध्ये खरेदी केले.
आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आल्या. आता लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंवर बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘धडाकेबाज’ अभिषेकसाठी पंजाब-हैदराबादमध्ये रंगली चुरस; अखेर मोठ्या रकमेसह… (mahasports.in)
राहुल नाम तो सुना होगा! ९ कोटींची घसघशीत कमाई करत तेवतिया बनला ‘या’ संघाचा भाग (mahasports.in)