---Advertisement---

‘रिकी पाँटिंग यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू एक दिवस…’, भारतीय खेळाडूचा मोठा खुलासा

On: शुक्रवार, मार्च 25, 2022 12:26 AM
Avesh-Khan
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग या जगातील सर्वात मोठ्या लीगचा १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहेत. आयपीएलने भारतीय संघाला अनेक उत्तम खेळाडू दिले आहेत. या लीगने भारतीय संघाला जसप्रीत बुमराहसारखा वेगवान गोलंदाज दिला आहे, तर हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू खेळाडू आयपीएलनेच भारतीय संघाला दिला आहे. तसेच, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सुद्धा आयपीएलचीच देणगी आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना रोहितने संघाला ५ विजेतीपदे जिंकून दिली आहेत. 

मागील आयपीएल हंगामात दोन खेळाडू भारतीय संघाला मिळाले, यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडने २०२१च्या हंगामात सर्वाधिक ६३५ धावा केल्या. तसेच हर्षल पटेलने ३२ विकेट्स घेतल्या होत्या. या दोन खेळाडूंशिवाय अजून एका खेळाडूने १४व्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. आवेश खानने (Avesh Khan) मागील हंगामात दिल्ली संघाकडून खेळताना २४ विकेट्स घेतल्या.

आवेश खान आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. लखऊने त्याला १० कोटींमध्ये संघात घेतले आहे. त्याने दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पाॅटिंग यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आवेश खान म्हणाला, “दिल्ली कॅपिटल्ससोबतच्या पहिल्या सामन्यापूर्वी रिकी पाॅटिंग यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले एक दिवस तू भारतासाठी खेळशील. ही तुझी वेळ आहे. तू स्वत:ला सिद्ध केले आहे. कारण, तू मागील ४ वर्षांपासून दिल्ली संघासोबत आहे.”

आवेश पुढे म्हणाला, “पाॅटिंग यांनी नेहमीच मला मदत केली आहे. असे नाही कारण मी खेळत नव्हतो, मी फक्त नेट्समध्ये गोलंदाजी करत होतो. ते मला नेहमीच प्रेरित करत होते. त्यांना मला माझ्या संधीसाठी तयार करायचे होते. कारण, मी त्या १२-१३ खेळाडूंमध्ये असायचो, ज्यांना सामन्यासाठी निवडले जायचे, परंतु मी प्लेईंग इलेव्हनमध्ये आपले स्थान नाही मिळवू शकलो. मागील वर्षी पहिल्या सामन्यापासूनच प्लेइंग इलेव्हनचा भाग होतो आणि मी त्यांचे मत खरे ठरवण्यासाठी सक्षम झालो.”

आवेश खानने आतापर्यंत २५ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने ८.२३च्या इकॉनॉमी रेटने २९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २ सामन्यात भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने २ विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कशी असेल आयपीएल २०२२साठी सज्ज असलेल्या मैदानांची खेळपट्टी? ‘या’ ४ मैदानांवर १० संघ करणार धमाल

धक्कादायक! दहशतवाद्यांकडून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमची रेकी? गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

गेली १२ वर्षे धोनीच होता सीएसकेचा संघनायक, पण त्याने ‘या’ खेळाडूच्या कॅप्टन्सीखाली खेळलाय एक सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---