आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये नव्याने सामील होणाऱ्या दोन फ्रँचायझींपैकी एक अहमदाबादविषयी वाद निर्माण झाला होता. अहमदाबाद फ्रँचायझीला विकत घेणारी कंपनी सीवीसी कॅपिटलचे सट्टा आणि झुगार व्यावसायात असलेल्या कंपनींशी संबध समोर आले होते. या विवादानंतर बीसीसीआयने (BCCI) सीवीसी कॅपिटलला अहमदाबाद फ्रेंचायझीचे लेटर ऑफ इंटेंट देले नव्हते. परंतु, आता या कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सीवीसी कॅपिटल (CVS Capital) या कंपनीला लवकरच लेटर ऑफ इंटेंट दिले जाईल. बीसीसीआयच्या तीन सदस्यांच्या कमिटीने त्यांना याबाबत क्लीन चिट दिली आहे.
तत्पूर्वी, सीवीसी कॅपिटलने ऑक्टोबर महिन्यात अहमदाबाद फ्रेंचायझीला ५६२५ करोड रुपयांमध्ये विकत घेतले होते. पण याच्या एक दिवसानंतरच सीवीसीचे सट्टाबाजारीतल कंपनींशी संबंध असल्याचे समोर आले होते. सीवीसी कॅपिटलच्या वेबसाईटवर देखील टिपिको आणि सिसल अशा दोन ऑनलाइन सट्ट्याच्या कंपन्यांचा उल्लेख होता. सीवीसी कॅपिटलने यापूर्वी फॉर्मुला १, फुटबॉल आणि रग्बी या खेळांमध्ये गुंतवणूक केली आहे. आयपीएलमध्ये आणि एकंदरीत क्रिकेट या खेळात गुंतवणूक करण्याची ही त्यांची पहिली वेळ आहे.
अधिक वाचा: “त्याच्या पायात स्प्रिंग आहे…”; खुद्द मास्टर-ब्लास्टरने गायले युवा भारतीय गोलंदाजाचे गुणगान
ललित मोदींना उपस्थित केला होता प्रश्न
सीवीसी कॅपिटलने ज्या दिवशी अहमदाबाद फ्रँचायझी विकत घेतली, त्याच दिवशी याविषयी प्रश्न उपस्थित गेला गेला होता. आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी ट्वीट करून बीसीसीआयवर यासंदर्भात निशाणा साधला होता. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘मला वाटते सट्टाबाजारातील कंपन्या आयपीएल संघ विकत घेऊ शकतात. एखादा नवीन नियम असावा. बोली लावणारे सट्टाबाजारातील एक मोठी कंपनी देखील आहेत. पुढे काय? बीसीसीआयने त्यांचा होमवर्क केला नव्हता का? याबाबतीत अँटी करप्शन काय निर्णय घेणार?’
व्हिडिओ पाहा – आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत
सीवीसी कॅपिटलला क्लीन चिट द्यायला उशीर झाला आहे. यापूर्वी बीसीसीआयने दोन्ही नवीन आयपीएल फ्रेंचायझींना त्यांच्या संघात तीन खेळाडूंना रिटेन करण्यासाठी वेळ दिला होता, आता हाकालावधी वाढवला जाऊ शकतो. बीसीसीआयने दोन्ही नवीन फ्रँचायझींना तीन खेळाडू संघात सामील करण्यासाठी २५ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. आता हा वेळ जानेवारी महिन्यापर्यंत वाढवून मिळू शकतो, अशी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ पंचरत्नावर असेल सर्वांची नजर
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड म्हणतेय, “जेव्हा वाटेल तेव्हा भारतात निघून जा…”; काय आहे कारण?