सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) हा भारतीय संघातील दिग्गज फलंदाज आहे. त्याच्या नावावर अनेक मोठ मोठे विक्रम आहेत. तसेच त्याला या खेळातील छोट्याछोट्या गोष्टी खूप चांगल्याप्रकारे माहीत होत्या. तो नेहमीच गोलंदाजांचा अभ्यास करून मैदानावर यायचा. त्यामुळे गोलंदाज पुढील चेंडू कुठला टाकणार आहे, याचा अंदाज त्याला आधीच यायचा. त्यामुळे सचिनकडून कौतुक होणं कुठल्याही युवा गोलंदाजासाठी मोठी गोष्ट असते. तो नेहमीच युवा भारतीय खेळाडूंचे कौतुक करत त्यांना सल्ले देत असतो. नुकताच त्याने भारतीय संघातील युवा गोलंदाजाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
भारतीय संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यावर संघातील वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. त्यावेळी युवा खेळाडूंना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. ज्याचा फायदा घेत युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच घरात जाऊन पराभूत करण्याचा विक्रम केला होता. यामध्ये मोहम्मद सिराजचा (mohammad siraj) देखील मोलाचा वाटा होता. आता याच मोहम्मद सिराजचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने गुणगान गायले आहे. (Sachin Tendulkar Praises mohammad siraj)
सचिन तेंडुलकरने ‘बॅकस्टेज विद बोरिया’ (backstage with boriya) या कार्यक्रमात मोहम्मद सिराजबद्दल बोलताना म्हटले की, “त्याच्या पायात स्प्रिंग आहे आणि मला हे पाहायला खूप आवडतं. त्याचा रन अप.. तुम्ही पाहु शकता की, तो खूप उर्जावन आहे. तो एक असा गोलंदाज आहे ज्याला पाहून तुम्ही अंदाज घेऊ शकत नाही की, दिवसातील पहिले षटक आहे की शेवटचे षटक. तो नेहमी तुमच्यावर दबाव आणत असतो. तो एक परिपूर्ण वेगवान गोलंदाज आहे. त्याची देहबोली खूप सकारात्मक आहे. मला या गोष्टी खरोखर आवडतात. तो खूप वेगाने शिकत आहे.”
Thank you @sachin_rt sir for this . It is a huge motivation for me coming from you .. I will always do my best for my country .stay well sir https://t.co/3qJrCBkwxm
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) December 22, 2021
सचिन तेंडुलकरने कौतुक केल्यानंतर मोहम्मद सिराज देखील प्रचंड खुश झाला आहे. त्याने देखील ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, “कौतुक केल्याबद्दल धन्यवाद सचिन सर.. तुम्ही कौतुक करणे हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मी माझ्या देशासाठी सर्वश्रेष्ठ कामगिरी करेल. स्वस्थ राहा सर…”
महत्वाच्या बातम्या :
काय सांगता? विश्वविक्रमवीर एजाजची न्यूझीलंड संघातून गच्छंती; प्रशिक्षक म्हणतायेत…
क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’
हे पाहा :