लवकरच भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका (india vs south africa) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान मिळालेल्या रिकाम्या वेळेत भारतीय संघातील खेळाडू भ्रमंती करताना दिसून आले आहेत. ज्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका आपल्या नावावर केली नाहीये. त्यामुळे यावेळी भारतीय संघ इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असणार आहे.( Cheteshwar pujara instagram post)
बुधवारी (२३ डिसेंबर) भारतीय संघाने सरावाच्या तणावातून बाहेर येऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू विश्रांती करताना दिसून आले होते. भारतीय संघातील दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील खेळाडू आर अश्विन (R ashwin) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि उमेश यादव (Umesh Yadav)तलावाच्या किनारी विश्रांती करताना दिसून येत आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने, “जेव्हा बुधवारच्या दिवशी रविवार असल्यासारखा अनुभव येतो..” असे लिहिले आहे.
तसेच दक्षिण आफ्रिका क्रिकेटने सोमवारी (२१ डिसेंबर) कोविड १९ ची भीती पाहता महत्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि सीएसएने संयुक्त निर्णय घेत, कसोटी मालिकेसाठी टिकिट उपलब्ध न करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली जाणार नाहीये.
असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ : विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर
क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’
हे नक्की पाहा: