आयपीएलमध्ये गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. आयपीएल सामन्यांमध्ये केवळ २० षटकांचा खेळ होत असल्यामुळे फलंदाज १-२ धावा काढण्यापेक्षा चौकार-षटकारांनी धावा जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे कमीत कमी धावा देत अधिकाधिक विकेट्स घेण्याचे आव्हान गोलंदाजांपुढे असते.
मात्र सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhvneshwar Kumar) याने गुजरात टायटन्सविरुद्ध (SRH vs GT) पहिल्या षटकात सपाटून मार खात नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या षटकात गुजरातच्या फलंदाजांनी केवळ ६ धावा केल्या आणि उरलेल्या अतिरिक्त धावा भुवनेश्वरमुळे मिळाल्या.
त्याचे झाले असे की, भुवनेश्वरने डावातील पहिले षटक टाकताना तब्बल १७ धावा खर्च (First Over-17 Runs)केल्या. त्याच्या या षटकादरम्यान गुजरातचे फलंदाज मॅथ्यू वेड याने १ चौकार व १ धाव आणि शुबमन गिल याने १ धाव घेत ६ धावा काढल्या. उर्वरित ११ धावा भुवनेश्वरच्या चूकीमुळे मिळाल्या. त्याने याषटकादरम्यान चक्क ११ वाईड चेंडू फेकले, ज्यामुळे विरोधी गुजरात संघाला अतिरिक्त धावा मिळाल्या.
अशाप्रकारे हैदराबाद संघाकडून कोणत्या सामन्यातील पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा देण्याच्या नकोशा विक्रमात भुवनेश्वरने डेल स्टेनची बरोबरी केली आहे. स्टेनने २०१५ मध्ये हैदराबादकडून खेळताना पहिल्या षटकात १७ धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळी हैदराबादचा विरोधी संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर होता.
याहूनही दुर्दैवाची बाब म्हणजे, भुवनेश्वरने ही नकोशी कामगिरी (Bhuvneshwar Kumar Unwanted Record) करण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी २०१६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हैदराबादकडून पहिले षटक टाकताना भुवनेश्वरने १३ धावा खर्च केल्या होत्या.
आयपीएल २०२२ मधील सर्वात महागडे पहिले षटक
इतकेच नव्हे तर, भुवनेश्वरने गुजरातविरुद्ध टाकलेले पहिले षटक हे आयपीएल २०२२ मधील सर्वात महागडे षटक ठरले आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान चेन्नईच्या पहिल्या षटकात १४ धावा आल्या होत्या. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यानही मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकात १२ धावा खर्च केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेसाठी पहिला विजय बनणार अजूनच अवघड! आरसीबीच्या ताफ्यात घातक गोलंदाजांची झालीय एन्ट्री
संघ मालकीन निता अंबानींपर्यंत गेली बातमी, मुंबईच्या चौथ्या पराभवानंतर खेळाडूंना फोन करत म्हणाल्या…
एकच पण जबरदस्त! हार्दिक पंड्याची सनरायझर्स विरुद्ध खास ‘सेंच्यूरी’, थेट विश्वविक्रमाला गवसणी