इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडताना दिसत आहेत. आयपीएलचा सर्वाधिक ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स चालू हंगामात निराशाजनक प्रदर्शन करतोय. आतापर्यंत ५ सामने खेळताना मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही. सहभागी १० संघांमध्ये मुंबई हा एकटा असा संघ आहे, जो आतापर्यंत त्यांच्या विजयाचे खाते उघडू शकलेला नाही. गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेला या संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची समीकरणे कठीण झाली आहेत. परंतु अद्याप त्यांच्यासाठी प्लेऑफची दारे बंद झालेली नाहीत.
मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी काय करावे लागेल
चालू हंगामातील (IPL 2022) आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबई संघाचे (Mumbai Indians) अजून ९ सामने खेळायचे बाकी आहेत. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी या ९ पैकी ८ सामने जिंकावे लागणार आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. मात्र जर त्यांनी पुढील आठ सामन्यात विजय मिळवला, तर त्यांच्या खात्यात १६ गुण जमा होतील. परंतु नेट रन रेटच्या बाबतीत त्यांना इतर संघांकडून आव्हान मिळू शकते. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी १६ गुणांसह चांगल्या नेट रन रेटचीही गरज भासेल, जेणेकरून त्यांना गुणतालिकेत पहिल्या ४ संघांमध्ये जागा बनवता (Mumbai Indians Play Off Equations) येतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएलमध्ये मुंबईप्रमाणेच ४ संघांवरही ओढावलीय नामुष्की
ही पाचवी वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने आयपीएल हंगामातील त्यांचे सुरुवातीचे सलग ५ सामने गमावले असतील. मुंबई इंडियन्सचे नाव या यादीत दोन वेळा येते.
आयपीएल २०१२मध्ये डेक्कन चार्जर्सने हंगामातील सुरुवातीच्या सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करला होता. चाहत्यांसाठी ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखाद्या संघाने हंगामाच्या सुरुवातीला सलग पाच पराभव पत्करले होते. त्यानंतर २०१३ हंगामात दिल्ली कॅपिटल्सने ही नकोशी कामगिरी पुन्हा प्रत्यक्षात उतरवली. आयपीएल २०१४मध्ये मुंबई इंडियन्सच्या नावावर ही नकोशी कामगिरी पहिल्यांदा नोंदवली गेली. त्यानंतर २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चालू हंगामात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने त्यांचे सुरुवातीचे सलग पाच सामने गमावले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गतवर्षी पूर्णपणे फ्लॉप झालेले ‘हे’ क्रिकेटर्स, आयपीएल २०२२मध्ये करतायत धमाका; दिनेश कार्तिकही यादीत
स्वागत करू नववर्षाचे! चेन्नईच्या खेळाडूंकडून तमिळ नवीन वर्ष जल्लोषात साजरे, पाहा Video