रविवारी (१५ मे) खेळल्या गेलेल्या डबल हेडरचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. सीएसकेने या सामन्यात ‘जूनियर मलिंगा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मथीशा पथिरानाला पदार्पणाची संधी दिली. पथिराना देखील संघाने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरला.
सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचे फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर आले, तेव्ह त्यांचे सलामीवीर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. गुजरातने पहिल्यात ७ षटकांमध्ये एकही विकेट न गमावता ५९ धावा केल्या होत्या. अशात धोनीने आठव्या षटकात श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) याच्या हातात चेंडू दिला. स्वतःचे पहिले आयपीएल षटक टाकण्यासाठी आलेल्या पथिरानाने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि सर्वांनाच हैराण केले.
मथीशा पथिराना कर्णधार धोनीच्या अपेक्षांवर खरा उतरला. गुजरातने डावाच्या आठव्या षटकातील पहिल्या चेंडुवर सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याची विकेट गमावली. पथिरानाने गिलला पायचित बाद केले. गिलने १७ चेंडूत १८ धावा केल्या आणि तंबूत परतला. गिलनंतर पथिरानाने दुसरी विकेट घेतली ती, कर्णधार हार्दिक पांड्याची. १४ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने हार्दिकला अवघ्या ७ धावांवर खेळत असाताना शिवम दुबेच्या हातात झेलबाद केले.
What a start my man baby Malinga 🙌🇱🇰❤️ https://t.co/pPtlvRT3hZ
— Riyas Ali (@lamriyas) May 15, 2022
Baby Malinga is here. pic.twitter.com/qbvwlEuO2H
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 15, 2022
दरम्यान, फेब्रुवारी माहिन्यात पार पडलेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात पथिरानाला खरेदी करण्यासाठी एकही संघ इच्छुक नव्हता आणि तो अनसोल्ड राहिला होता. पण नशिबाची साथ असल्यामुळे त्याला याच हंगामात पदार्पणाची संधी मिळाली. सीएसकेसाठी खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू हंगामातून बाहेर पडला.
अशात सीएसकेने बदली खेळाडूच्या रूपात पथिरानाला संघात सामील केले. २० लाखाच्या बेस प्राईसवर खरेदी केलेल्या या खेळाडूला सीएसकेने पदार्पणाची संधी देखील दिली आणि तो या विश्वासास पात्र देखील ठरला आहे. माजी दिग्गज लसिथ मलिंगा आणि मथीशा पथिरानाची गोलंदाजी ऍक्शन बऱ्याच अंशी एकसारखी आहे. याच कारणास्तव त्याचा त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्या चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ये हुई ना बात! ‘मराठमोळ्या’ ऋतुराजने सचिनच्या होम ग्राउंडवरच मोडला त्याचा ‘स्पेशल’ विक्रम
बॅटवर स्टिकर लावण्याचे क्रिकेटर्सला किती पैसे मिळतात? जाणून घ्या भारताच्या स्टार खेळाडूंबद्दल
तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी