आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला ५४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात पंजाबचा अष्टपैलू लियाम लिविंगस्टोनने अप्रतिम प्रदर्शन केले आणि सामनावीर ठरला. प्रथम फलंदाजी करताना त्याने ३२ चेंडूत ६० धावांची महत्वाची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. सीएसकेचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोची विकेट लिविंगस्टोननेच घेतली त्याने ब्रावोचा ज्या पद्धतीने झेल घेतला, तो पाहून सामना पाहत असलेला प्रत्येकजण हैराण झाला.
लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने सामन्यात अष्टपैलू भूमिका साकारली. फलंदाजीत त्याने पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक ६० धावांचे योगदान दिले आणि संघाला १८० धावांपर्यंत पोहचवू शकला. त्यानंतर गोलंदाजीत त्याने सुरुवातीला शिवम दुबेला ५७ धावांवर बाद केले आणि सीएसकेच्या विजयाच्या आशा जवळपास संपवल्या. पुढच्याच चेंडूवर त्याने अप्रतिम झेल घेत ड्वेन ब्रावोला मैदानाबाहेर धाडले.
लिविंगस्टोनने टाकलेल्या या चेंडूला ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) याने ऑफ साइडला डिफेंस करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटवर व्यवस्थित न बसल्यामुळे हवेत उडाला. त्यानंतर गोलंदाज लिविंगस्टोनने डाव्या बाजूला लांब डाईव्ह मारली आणि झेल घेतला. लिविंगस्टोनने दाखवलेली चपळाई पाहून चाहते आणि जाणकार हैराण झाले. स्वतः फलंदाजी करणारा ब्रावोही त्याचा हा झेल पाहून चकित झाला, यासाठी त्याचे सर्वजन कौतुक देखील करत आहे. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SportsHustle3/status/1510670536913080320?s=20&t=yTlrKs0rqB-5u30Ba93S2w
What a catch, Livingstone. pic.twitter.com/hsf1PmqRuu
— Johns. (@CricCrazyJohns) April 3, 2022
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने लिविंगस्टोनला संघात सामील करण्यासाठी ११ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. लिविंगस्टोननेही त्याच्यावर संघाने खर्च केलेल्या पैशाला साजेसे प्रदर्शन केले आहे आणि पुढेही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना त्याच्याकडून आहे.
सीएकेविरुद्धच्या या सामन्याचा विचार केला, तर पंजाब किंग्जसाठी लिविंगस्टोनने ३२ चेंडूत सर्वाधिक ६० धावा केल्या. तसेच सलामीवीर शिखर धवनने २४ चेंडूत ३३ धावा केल्या. पंजाबने २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १८० धावा केल्या. प्ररत्युत्तरात सीएसकेने १२६ धावा केल्या आणि त्यांचा संपूर्ण संघ बाद झाला.
महत्वाच्या बातम्या –
चेन्नईकडून पहिल्या ३ सामन्यात घोर निराशा, ‘त्या’ मॅच विनर खेळाडूची आठवण काढत जडेजा म्हणाला…
धोनीच्या प्राणामिकपणाने जिंकले हृदय! स्वत:हून पंचांना म्हणाला, आधी रिप्ले पाहा, मग निर्णय द्या