आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात सीएसकेला ५४ धावांनी पराभव पत्करावा लागला. सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरची कमतरता आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यापासून सर्वांनाच जाणवत आहे. पंजाबविरुद्धच्या या पराभवानंतर स्वतः सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजानेही मान्य केले की, चाहरची कमी संघाला जाणवत आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने लागोपाठ पराभव स्वीकारले आहेत. या पराभवानंतर सीएसकेच्या खेळाडूंवर चाहते टीका करू लागले आहेत. वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) ला सीएसकेने मेगा लिलावात १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होता, परंतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळताना त्याच्या पायाचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले आणि तो अद्याप त्या दुखापतीतून सावरू शकलेला नाहीय.
पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएल २०२२ मधील सलग तिसरा पराभव पत्करल्यानंतर सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला की, “दीपक चाहर निश्चितच आमचा महत्वाचा गोलंदाज आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, तो लवकरात लवकर संघात पुनरागमन करेल. नवीन चेंडूने विकेट घेणे खूप महत्वाचे असते. एका गोलंदाजी आक्रमणाच्या रूपात तुम्ही पावर प्लेमध्ये दोन-तीन विकेट्स घेण्याची अपेक्षा ठेवता. त्याची उपस्थितीत गोलंदाजी आक्रमणाला मजबूती देते. दीपकने लवकर पुनरागमन करणे महत्वाचे आहे, कारण नवीन चेंडूने विकेट घेणे खूप महत्वाचे आहे.”
सीएसकेचा महत्वाचा खेळाडू दीपक चाहर एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असून मध्यक्रमात एका फलंदाजाचीही भूमिका पार पाडू शकतो, जी त्याने यापूर्वी पार पाडलेली आहे. त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतानाही अनेकदा अप्रतिम फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. अशात त्याच्या पुनरागमनानंतर सीएसकेच्या गोलंदाजीसह फलंदाजीही अधिक बळकट होऊ शकते. सीएसकेला त्यांचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत खेळायचा आहे, जो १७ मार्च रोजी डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित केला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या –
रिषभची दिल्ली फ्रँचायझी बनणार आणखी मजबूत, ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज लवकरच उतरणार मैदानात
IPL 2022| चेन्नईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर ‘मिस्टर आयपीएल’ चर्चेत; रैनाच्या पुनरामनाची होतेय मागणी