मुंबई। चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२२चा २२ वा सामना मंगळवारी (दि. १२ एप्रिल) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअमवर पार पडणार आहे. हा चेन्नई आणि बेंगलोरचा हंगामातील पाचवा सामना आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात पराभव स्वीकारला आहे, तर बेंगलोरने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय आणि १ सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. अशात चेन्नई संघ बेंगलोरविरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल.
असे असू शकतात संभावित संघ
आयपीएलच्या १५व्या हंगामात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व करत आहे. त्याला आपल्या नेतृत्वात आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यात एकदाही विजय मिळवून देता आला नाही. आता हा दुष्काळ जडेजा बेंगलोरविरुद्ध संपवण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईच्या संभावित ११ जणांच्या (CSK Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास रॉबिन उथप्पा आणि फॉर्मशी झगडत असलेला ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजी करू शकतात.
तसेच, मधल्या फळीत मोईन अली, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे खेळू शकतात. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून रवींद्र जडेजा संघाला मजबूती देऊ शकतो. यष्टीरक्षक म्हणून संघात एमएस धोनी मोठा खेळाडू आहे. दुसरीकडे गोलंदाजी विभागाची जबाबदारी ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी यांच्याकडे आहे. यांना अली, दुबे आणि जडेजा गोलंदाजीत मदत करू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाबाबत बोलायचं झालं, तर संघाने हंगामातील आतापर्यंत ४पैकी ३ सामने खिशात घातले आहेत. तसेच, ते गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे चेन्नईविरुद्ध विजय मिळवत त्यांचे स्थान आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करतील. पहिल्यांदाच फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगलोर संघाच्या पाचव्या सामन्यासाठीच्या संभावित ११ जणांच्या संघाचा विचार केला, तर कर्णधार फाफ डू प्लेसिस अनुज रावतसह सलामीला उतरू शकतो. तसेच, मधल्या फळीत विराट कोहली, डेविड विली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांना मधली फळी सांभाळावी लागेल. तसेच, यांना यष्टीरक्षक दिनेश कार्तिकही साथ देऊ शकतो. दुसरीकडे शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असू शकेल.
आमने- सामने
चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आतापर्यंत २८ सामने खेळले आहेत. यातील चेन्नईने १८ सामन्यात विजय मिळवला आहे, तर बेंगलोरला ९ वेळा चेन्नईला नमवण्यात यश आले आहे. तसेच, १ सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आहे.
हवामान आणि खेळपट्टी
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore) संघातील सामना डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअमवर होणार आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना उसळी मिळते. मात्र, दव असल्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे नाणेफेक जिंकून संघ प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरेल. तसेच, ही खेळपट्टी दोन्ही विभागांसाठी फायदेशीर ठरू शकते. धावांबाबत बोलायचं झालं, तर या मैदानावर १६०-१७० धावा चोपल्या जाण्याची शक्यता आहे.
सामन्याच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं, खेळादरम्यान पावसाची शक्यता नाही. सामन्याच्या दिवशी ५२% आर्द्रता आणि १३-१५ किमी/ताशी वाऱ्याच्या वेगासह तापमान ३२-३४° सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) चेन्नई विरुद्ध बेंगलोर (CSK vs RCB) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामना १२ एप्रिल, २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामना डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअम येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी सायंकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
चेन्नई सुपर किंग्स: रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, महेश थीक्षणा, मुकेश चौधरी, ऍडम मिल्ने, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चाहर, डेव्हन कॉनवे , मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, हरी निशांत, एन जगदीसन, सुभ्रांशू सेनापती, प्रशांत सोळंकी, केएम आसिफ, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगारगेकर आणि भगत वर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा, आकाश दीप, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, जोश हेझलवूड, जेसन बेहरेनडॉर्फ, चामा व्ही मिलिंद, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शेरफेन रुदरफोर्ड आणि अनिश्वर गौतम.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्याजासकट परतफेड! उमरानने १४०kph वेगाचा चेंडू मारला, चिडलेल्या हार्दिकनेही दिले भारी प्रत्युत्तर
अरेरे! हार्दिकने मोडला स्वत:चाच विक्रम, हैदराबादविरुद्ध ‘कासवा’सारखा खेळत नकोसा विक्रम नावावर
वॉट अ कॅच! खतरनाक शुभमनला आऊट करण्यासाठी त्रिपाठीचा हवेत सूर मारत एकहाती झेल- Video