ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर टी-२० क्रिकेटमधील एक महान फलंदाज आहे. आयपीएल २०२२ च्या ५० सामन्यात वॉर्नर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज बनला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील या सामन्यात वॉर्नरला शतक करण्यासाठी अवघ्या काही धावा कमी पडल्या.
टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या बाबतील डेविड वॉर्नर (David Warner) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) बरोबरीवर होते. पण आता वॉर्नरने गेलला मागे टाकले आहे. वॉर्नरने त्याचा जुना संघ सनरायझर्स हैदराबादला या सामन्यात स्वतःचे महत्व दाखवून दिले. वॉर्नरने ५८ चेंडू खेळले आणि १२ चौकारांसह ३ षटकार ठोकत नाबाद ९२ धावा केल्या. यादरम्यान त्याने अवघ्या ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
टी-२० सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्यांमध्ये आता वॉर्नरचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे, ज्याने ८९ अर्धशतके केली आहेत. ख्रिस गेल ८८ अर्धशतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर विराट कोहली ७७ अर्धशतकांसह तिसऱ्या, एरॉन फिंच ७० अर्धशतकांसह चौथ्या आणि रोहित शर्मा ६० अर्धशतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
https://twitter.com/IPL/status/1522251041299120128?s=20&t=VIZjCIYizO5WLlxygmlx-Q
दरम्यान, आयपीएल २०२१ मध्ये वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. मागच्या हंगामानंतर त्याने हैदराबाद संघाची साथ सोडली आणि त्याचा सुरुवातीचा संघ म्हणजेच दिल्ली कॅपिटल्समध्ये सहभागी झाला. हैदराबाद संघ सोडल्यानंतर हा त्यांच्याविरुद्ध खेळलेला वॉर्नरचा पहिला सामना होता, जो त्याने चांगलाच गाजवला.
मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबदच्या संघ व्यवस्थापनाने वॉर्नरसोबत गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर त्याने संघ सोडला आणि मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने मोठी रक्कम खर्च करून त्याला खरेदी केले. आता वॉर्नरने या ९२ धावांच्या धमाकेदार खेळीनंतर हैदराबाद संघाला त्यांची चूक दाखवून दिली आहे. या सामन्यात वॉर्नरला वेस्ट इंडीजच्या रोवमन पॉवेलने चांगली साथ दिली. पॉवेलने ३५ चेंडूत ६७ धावा ठोकल्या. यामध्ये त्याच्या ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या दोघांच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ३ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा उभ्या केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
उमरान मलिकचं यश पाहून पाकिस्तानी क्रिकेटर म्हणाला, ‘कोणीही उठतं, शूज घेऊन फास्ट बॉलर बनायला जातं’
वॉर्नरने घेतला ‘अपमानाचा बदला’! सनरायझर्सच्या गोलंदाजांची धुलाई करत पूर्ण केले ४०० सिक्स






