---Advertisement---

Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास

On: शुक्रवार, मे 6, 2022 8:59 AM
David-Warner
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात गुरुवारी (५ मे) सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि मध्यक्रमात रोवमन पॉवेलने धमाकेदार प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला. वॉर्नरचे शतक अवघ्या काही धावा कमी पडल्यामुळे हुकले. हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने किफायतशीर गोलंदाजीचे प्रदर्शन केले. परंतु, त्याच्याच एका चेंडूवर वॉर्नरने एक उत्कृष्ट शॉट खेळला, ज्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांपुढे दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करत होते, पण डेविड वॉर्नर  (David Warner) मात्र त्याच्या लयीत खेळत होता. वॉर्नरने सामन्यात ५८ चेंडू खेळले आणि यामध्ये नाबाद ९२ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १२ चौकार आणि ३ षटकारांचा सामावेश होता. वॉर्नरला साथ मिळाली रोवमन पॉवेलची, ज्याने अवघ्या ३५ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या. या धावा करण्यासाठी पॉवेलने ३ चौकार आणि त्यापेक्षा जास्त म्हणजेच ६ षटकार ठोकले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वॉर्नरच्या ज्या शॉटचे सोशल मीडिया तसेच दिग्गजांकडून कौतुक केले जात आहे, तो दिल्लीच्या डावातील १९ व्या षटकात पाहायला मिळाली. हे भुवनेश्वर कुमारच्या कोट्यातील शेवटचे षटक होते. भुवनेश्वरने त्याच्या पहिल्या तीन षटकात फक्त ११ धावा खर्च केल्या होत्या, पण शेवटच्या षटकात त्याचीही धुलाई झाली.

या षटकातील पहिल्या चेंडूवर वॉर्नर रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण भुवनेश्वरने त्याचा डाव ओळखला आणि चेंडू वाईड यॉर्कर टाकला. परंतु, वॉर्नरनेही त्याचा अनुभव पणाला लावला आणि फलंदाजीची बाजूच बदलली. त्याने चेंडूला फक्त बॅटने स्पर्श केला आणि हा चेंडू थेट सीमारेषेपार जाऊन थांबला. भुवनेश्वरच्या या षटकात तीन चौकार गेले.

व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, मागच्या वर्षी सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये वॉर्नरसोबत गैरवर्तन झाल्याची चर्चा झाली होते. आता हैदराबाद संघ सोडल्यानंतर वॉर्नरने त्यांच्याविरुद्ध पहिला सामना खेळला आणि स्वतःचे महत्व दाखवून दिले. वॉर्नरच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादला २१ धावांच्या अंतराने पराभूत केले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

बड्या दिलाचा वॉर्नर! स्वत:च्या शतकाची नाही केली पर्वा, संधी असूनही पॉवेलला म्हणाला, तोडूनफोडून टाक!

वॉर्नर आणि पॉवेलने चोपले, खलील अहमदने रोखले; दिल्लीचा हैदराबादवर २१ धावांनी विजय

जिंकलस केन! हैदराबादविरुद्ध नाबाद ९२ धावा चोपणाऱ्या वॉर्नरची विलियम्सनने थोपटली पाठ, पाहा Photo

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---