---Advertisement---

टिक टिक बुम! रोहित आणि बुमराह पोहोचले मुंबईत, ‘पलटण’ने शेअर केला झक्कास व्हिडिओ

Jasprit-Bumrah-And-Rohit-Sharma
---Advertisement---

आयपीएलचा १५ वा हंंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत, तर काही खेळाडू मुंबईमध्ये पोहोचले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा यावर्षी नवव्यांदा मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमधील यशस्वी संघ आहे. रोहित यावर्षी नव्या अवतारात दिसण्याची शक्यता आहे. रोहित आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुंबई इंडियन्स संघाने ट्वीट करत बुमराह आणि रोहित फ्रॅंचायझीला (Rohit Sharma) जोडले असल्याची पुष्टी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्वीट करत लिहिले आहे की, “पाहा ते आले आहेत.” तसेच, फ्रॅंचायझीने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह ट्राॅफींसोबत दिसत आहे. त्यावर लिहिले आहे की, ‘टिक टिक बूम.’

https://twitter.com/mipaltan/status/1503591433583824901

पाच वेळा आयपीएलचे (IPL 2022) विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघाने नुकतीच नवी जर्सी लाँच केली आहे. यावर्षी मुंबईच्या जर्सीचा लूक थोडा वेगळा पाहायला मिळणार आहे. कारण, निळ्या आणि सोनेरी रंगात वेगळा पॅटर्न पाहायला मिळाला. आयपीएलचा पहिला सामना सीएसके आणि केकेआर या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. मुंबई संघाचा पहिला सामना २७ मार्चला दिल्ली संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. आयपीएल २०२२ चा अंतिम सामना २९ मेला खेळला जाईल.

सीसीआयने यावर्षी आयपीएलच्या फाॅरमॅटमध्ये बदल केला आहे. यावर्षी आयपीएलमध्ये ८ नव्हे, तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. त्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. त्यामधील प्रत्येक संघाला विरुद्ध गटातील संघांसोबत दोन सामने खेळायचे आहेत आणि आपल्या गटातील संघासोेबत एक- एक सामना खेळायचा आहे.

या बदललेल्या फाॅरमॅटनुसार मुंबई इंडियन्सला केकेआर, राजस्थान राॅयल्स, दिल्ली, लखनऊ आणि सीएसके संघांसोबत दोन-दोन सामने खेळायचे आहेत. तसेच हैदराबाद, बेंगलोर, पंजाब आणि गुजरात या संघांसोबत मुंबईला एक-एक सामना खेळायचा आहे. मुंबई संघ एकूण १४ सामने खेळेल.

महत्त्वाच्या बातम्या-

बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचा ‘श्रेयस’ बनलेला ‘अय्यर’ सामनावीर; संपूर्ण मालिकेतील कामगिरी नजरेत भरणारी

आयपीएल संघांचे पैसे पाण्यात! रबाडा अन् मॅक्सवेलसह ‘हे’ २६ परदेशी खेळाडू मुकणार सुरुवातीचे सामने?

कुठून येतो हा कॉन्फिडन्स? IPL आणि PSL बाबत रमीज राजा यांचे ओपन चॅलेंज पाहून तुम्हीही असंच म्हणाल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---